Ads Area

School Reopen In State Education Minister

सोमवार पासून इ. १ली ते १२ वी च्या

शाळा सुरू होणार !

शालेय शिक्षणमंत्री

 शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इ. १ली ते १२ वी च्या शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकाऱ्यांना प्रदान करणेबाबत

१.शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी व शहर भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. एकूणच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी व महापालिका हद्दीतील इयत्ता १ ली ते ७ वी चे वर्ग दिनांक ०१ डिसेंबर, २०२१ रोजी पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यांतील शाळा सोमवार पासून पुन्हा सुरू होत आहे पण काही अटी मान्य करून ! सविस्तर वाचा

स्थानिक प्रशासनाला अधिकार प्रदान

२. दरम्यान राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन संदर्भ क्र.११ येथील आदेशान्वये राज्यातील सर्वच शाळा दिनांक १५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. तथापि, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा भागातून शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने राज्यातील इ.१ ली ते १२ वी च्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करुन दिनांक २४ जानेवारी २०२२ पासून शाळा पुन्हा सुरु करण्याचे अधिकार महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना शाळा सुरु करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

स्थानिक प्रशासन जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाही नोंद घ्यावी

लसीकरण १००%

३. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण (दोन्ही मात्रा) झालेले असावे.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण १००% आवश्यक आहे त्याशिवाय शाळेत हजर रहाण्याची परवानगी नाही

४. शाळेतील १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संबंधित शाळेत करणेबाबत सर्व शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियोजन करावे

५. दिनांक २४ जानेवारी, २०२२ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा.

मा. शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड  Live

पालकांचे संमती पत्र

६. वरीलप्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी शासनाने वेळोवेळी संदर्भाधीन परिपत्रकांन्वये दिलेल्या मागदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच सदर मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार कोविड- १९ संदर्भात संबंधित शाळांनी मार्गदर्शक सूचना निश्चित कराव्यात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad