Reading Campaign Twelve Week For Student

१०० दिवसांकरिता वाचन अभियान

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ,पुणे

 १०० दिवस वाचन अभियान

  केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात

 दिनांक १ जानेवारी २०२२ पासून शंभर दिवस वाचन अभियान (Reading campaign) हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्य व अभिरुची विकसित होण्यासाठी दर आठवड्याला बालवाटिका ते इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी वाचन संदर्भाने वेगवेगळे उपक्रम घेणे अपेक्षित आहे

आठवडा बारावा सुरू

   दिनांक १९/३/२०२२ ते २५/३/२०२२

गट -१

 बाल वाटिका ते इयत्ता दुसरी

ड्रॉप एव्रिथिंग अँड रीड (DEAR)

कोणत्याही एका ठरवलेल्या दिवशी शाळेतील प्रत्येकजण शाळेत किंवा घरी असतील तरी इतर कोणतेही काम न करता फक्त किमान २० मिनिटे प्रकट वाचन करतील.
यासाठी वेळ ठरवता येईल. उदा- मंगळवारी
सकाळी ११ शाळेत उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी हे सुनिश्चित करतात की ते या उपक्रमासाठी तयार आहेत आणि सोबत काही वाचन साहित्य आणतात.

गट -२

 इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवी

ड्रॉप एव्रिथिंग अँड रीड (DEAR)

कोणत्याही एका ठरवलेल्या दिवशी शाळेतील प्रत्येकजण शाळेत किंवा घरी असतील तरी इतर कोणतेही काम न करता फक्त किमान २० मिनिटे प्रकट वाचन करतील.

यासाठी वेळ ठरवता येईल. (उदा. शाळेत मंगळवारी सकाळी ११:०० वा)

शाळेतील सर्व उपस्थित - विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी हे या उपक्रमासाठी तयार असल्याची खात्री करून घेतात आणि काही वाचन साहित्य देतात.

गट -३

 इयत्ता सहावी ते आठवी

कविता वाचन

• विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या आवडीच्या किंवा शिक्षकांनी शिफारस केलेल्या कवींच्या कविता वाचण्यास सांगितले जावे.

कृतींचा सराव म्हणून, ते शिकलेल्या काव्यात्मक शब्दांचा वापर करून त्यांची स्वतःची कविता तयार करतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad