समूह साधन केंद्र समन्वयक
(केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा
परीक्षा -२०२५ Admit Card उपलब्ध ! MSCE Pune
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. सुधारीत प्रसिद्धी निवेदन
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी १., दिनांक १५/०९/२०२२ व शासन निर्णय दिनांक २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दिनांक ०३/०२/२०२६ व ०४/०२/२०२६ या कालावधीत प्रत्येकी तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात येत आहे.
परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे
Admit Card/Hall Ticket Available
️➤सर्वप्रथम खालील दिलेली लिंकवर क्लिक करा
➤भाषा सिलेक्ट करा
➤Registration किंवा रोल नंबर टाका
➤पासवर्ड/जन्म दिनांक टाका
➤Captcha टाका
➤प्रवेश पत्र डाउनलोड करा
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -२०२५
दिनांक ५ फेब्रुवारी, २०२६ रोजी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद साठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. शिक्षण विभागातील केंद्र समन्वयक केंद्रप्रमुखांचे तब्बल २४१० पदे रिक्त असून समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) या पदांच्या भरतीसाठी राज्यभरातील ४६०६८ शिक्षक उमेदवारांची मर्यादित विभागीय स्पर्धा ऑनलाइन परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार दिनांक ३ व ४ फेब्रुवारी, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी ज्या १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका आहेत, त्यामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांचा देखील समावेश आहे.
जून २०२३ पासून केंद्र समन्वयक / केंद्रप्रमुख भरतीची प्रक्रिया प्रलंबित असून, तब्बल अडीच वर्षांचा विलंब या परीक्षेसाठी विविध अपरिहार्य न्यायालयीन व प्रशासकीय कारणास्तव झालेला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने गोपनीय संगणक संस्थेमार्फत राज्यभरातील परीक्षा केंद्रांवरील संगणकांच्या उपलब्धतेनुसार दिनांक ३ व ४ फेब्रुवारी, २०२६ या दोन तारखा निश्चित केलेल्या आहेत.
What's Up Group Join
➤ What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना