Senior Selected Salary Scale Important Instructions Online Training

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण

कालावधी व महत्वपूर्ण सूचनांबाबत

सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले होते. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी केलेली असून, सद्यस्थितीमध्ये संदर्भ क्र.३ च्या पत्रान्वये सदरचे प्रशिक्षण दिनांक १ जून, २०२२ पासून सुरु करण्यात आलेले आहे


तथापि संदर्भ क्र. ३ च्या प्रशिक्षण पत्रान्वये सदरचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणार्थी यांना ३० दिवसांचा कालावधी देण्यात आलेला होता, तथापि सद्यस्थितीमध्ये सदरच्या प्रशिक्षणासाठीचा कालावधी हा ४५ दिवसांचा करण्यात येत आहे. यानुसार प्रशिक्षणार्थ्याने आपल्या कोर्सला प्रथम लॉगीन झाल्यापासून ४५ दिवसांमध्ये सदरचा कोर्स / प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे.

अद्याप प्रशिक्षण सुरु नाही अशा प्रशिक्षणार्थी बाबतीत प्रशिक्षण प्रकार व इतर तपशील दुरुस्तीबाबत

•• खालील दुरुस्ती प्रक्रिया ही केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपला ई-मेल आय डी चुकीचा / अवैध नोंदवला आहे, स्वतःच्या चुकीने प्रशिक्षण प्रकार अथवा प्रशिक्षण गट बदल झालेला आहे व त्यामुळे ऑनलाईन प्रशिक्षण सुरु झालेले नाही, केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यांनी दुरुस्ती करावी. ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण सुरळीत सुरु आहे अशा प्रशिक्षणार्थीनी आपल्या तपशिलात कोणतीही दुरुस्ती करू नये.

प्रशिक्षणार्थीच्या ईमेल, प्रशिक्षण गट प्रशिक्षण प्रकार यात दुरुस्ती करणेसाठी

 https://training.scertmaha.ac.in

 या पोर्टल वर नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया या टॅब वर क्लिक करून आवश्यक दुरुस्ती करता येईल.

• उपरोक्त दुरुस्ती करण्याची सुविधा या रविवार, दिनांक १९ जून २०२२ रोजी रात्री ८:०० वाजेपर्यंत उपलब्ध राहील. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थीच्या तपशीलाबाबतीतील कोणतीही दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही.

• प्रशिक्षणाच्या सर्व महत्वाचे अपडेटस, सुचना व तक्रार निवारण सुविधा ही केवळ https://training.scertmaha.ac.in या प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

स्वाध्यायाबाबत महत्वाच्या सूचना

प्रशिक्षणार्थी यांनी आपल्याला आपल्या प्रशिक्षणामध्ये दिलेला स्वाध्याय सांगितलेल्या स्वरूपामध्ये (PDF/व्हिडीओ/PPT) तयार करून सदर स्वाध्यायाचा फोल्डर आपल्या स्वतःच्या Google Drive / OneDrive ला अपलोड करून या फोल्डरची लिंक Get Link या पर्यायावर क्लिक करून Restrict मध्ये Anyone With The Link या पर्यायाची निवड करून सदरची लिंक अभिप्रायामध्ये देण्यात आलेल्या Text Box मध्ये पेस्ट करावी.

• प्रशिक्षणार्थी घटकनिहाय देण्यात आलेला स्वाध्याय आपल्या भाषेतून लिहू शकतात. तसेच स्वाध्यायाबाबतच्या आवश्यक सर्व सूचना प्रशिक्षण प्रणालीवर देखील देण्यात आलेल्या आहेत.

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण अधिकृत टेलिग्राम चॅनल

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या प्रणालीवर सुरू करण्यात आले आहे. याबाबतच्या सूचना वेळोवळी ईमेल, पत्र व https://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटद्वारे आपणास दिल्या जातात. तथापि अधिक माध्यमांद्वारे सर्व प्रशिक्षणार्थी यांच्यापर्यंत तात्काळ पोहोचता यावे, सूचना जाव्यात यासाठी सदर प्रशिक्षणाचे अधिकृत टेलिग्राम चॅनल तयार करण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थी आपल्या सोयीसाठी खालील टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात.

https://t.me/scertmaha

दैनिक शंका समाधान सत्र मिटिंग तपशील

या कार्यालयामार्फत दिनांक १ जून, २०२२ पासून सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेमध्ये प्रशिक्षणार्थी यांचेसाठी ऑनलाईन सभेच्या माध्यमातून दैनिक शंका समाधान व मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जात आहे. सदरच्या ऑनलाईन सभेमध्ये कमाल १००० व्यक्ती सहभागी होण्याची क्षमता आहे. तरी ज्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाबाबत काही समस्या अथवा अडचणी असतील तर त्यांनी खालील तपशिलाचा वापर करून सदरच्या सत्रास जॉईन होऊ शकतात.

Join Zoom Meeting

Meeting ID: 87296660474

Passcode: SCERT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad