Ads Area

Breaking News Maharashtra Board SSC Exam Result

दहावीचा निकाल जाहीर

कोकण विभाग अव्वल

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
 यंदा राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यात यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. 
यावर्षी 95.87 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण 92.05 टक्के इतके आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र बोर्डाचा 10 वीचा 93.83 % इतका निकाल, कोकण विभाग अव्वल

सर्व विभागातून कोकण विभाग अव्वल स्थानावर आहे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आले आहे
महाराष्ट्र 10वी निकाल 2023  सर्व 9 विभागांसाठी निकाल जाहीर

सर्व विभाग निकाल जाहीर झाले आहेत. 
खालील प्रमाणे उत्तीर्ण टक्केवारी  आहे

कोकण – ९८.११
कोल्हापूर – ९६.७३
पुणे – ९५.६४
मुंबई – ९३.६६
औरंगाबाद – ९३.२५
अमरावती – ९३.२२
नाशिक – ९२.६७
लातूर – ९२.६७
नागपूर ९२.०५

तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी निकाल घटला

निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. 

कोकण विभागाचा यंदाचा निकाल  98.11 टक्के लागला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे. नागपूर विभागाचा निकाल 92.05 टक्के इतका आहे.या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,77,256 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

Maharashtra Board

10 Th SSC Result 2023

निकाल पाहण्यासाठीच्या लिंक :

1) अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा

नवीन नवीन अपडेट करिता What's Up Group Join करा

What's Up Group Join

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad