विद्यार्थी व पालकांसाठी मोठी
बातमी!- 11वी प्रवेशाचे सविस्तर
वेळापत्रक जाहीर
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 8 जूनपासून सुरूवात होणार आहे.
तुम्हाला माहिती असेल, याआधी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरला होता. आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग दोन भरायचा आहे.
जाणून घ्या कसे आहे वेळापत्रक
● दिनांक 8 ते 12 जून - प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे म्हणजे नियमित फेरी-1 साठी पसंती अर्ज भाग-2 ऑनलाईन सादर करणे.
विद्यार्थ्यांना भाग-2 मध्ये किमान एक व कमाल 10 पसंतीक्रम नोंदविता येतील.
विद्यार्थ्यांना डेटा प्रोसेसिंगनंतर भाग-2 मध्ये दिलेल्या त्यांच्या पसंतीनुसार प्रवेशासाठी महाविद्यालय मिळेल
● दिनांक 12 जूनला - प्रवेश अर्ज भाग एक भरणे, मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करणे.
● दिनांक 13 जूनला - तात्पुरती पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार.
● दिनांक 13 ते 15 जून - विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये चुका असल्यास दुरुस्ती संदर्भात गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविणे.
● दिनांक 15 जूनला - अंतीम गुणवत्ता यादी तयार करणे.
● दिनांक 19 जूनला - पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार.
● दिनांक 19 ते 22 जून* - विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे.
● दिनांक 23 जूनला - दूसर्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे.
दरम्यान प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेऱ्यांच्या तारखा बोर्डाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्की पोहचवू.
11वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले - हि बातमी 11वी च्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा


आपली प्रतिक्रिया व सूचना