( SQAAF) शाळा गुणवत्ता
मूल्यांकन आणिआश्वासन
आराखडा गुगल ड्राईव्हला Pdf
अपलोड करणे ! संपूर्ण मार्गदर्शन
सर्वांना नमस्कार
सध्या आपल्याला SQAAF च्या साईट वर संबंधित मानकांचे फोटो अपलोड करायचे काम करायचे आहे. या विषयी
महत्त्वाचे
प्रथमता सर्वांनी समजून घ्या. आपण माहिती भरत आहात हे स्वयं मूल्यमापन आहे याचे बाह्य मूल्यमापन होणार आहे
प्रश्न आम्ही 4 था स्तर निवडल्यानंतर सर्व स्तर ची संपूर्ण माहिती भरावयाची आहे का?
उत्तर=सर्वात महत्त्वाचे आपण जो स्तर निवडला आहे त्या स्तराचे सर्व पुरावे त्या स्तरांमध्ये प्रथमता अपलोड करावेत जर का आपल्याकडे उपलब्ध असतील तरच इतर स्तरांचे पुरावे अपलोड केले तरी चालतील पण सक्तीचे नाही
बाकी स्तराचे फोटो पुरावे अपलोड करण्याची गरज नाही त्याचे ऑफलाइन रेकॉर्ड आपण तयार करून ठेवायचे आहे ज्या वेळेला बाह्य मूल्यमापन होईल त्या वेळेला सर्व रेकॉर्ड स्तर 1पासून 4 पर्यंतचे सर्व रेकॉर्ड पुरावे प्रत्यक्ष दाखवावयाचे आहेत ही बाब महत्त्वाची आहे त्यामुळे ऑनलाईन माहिती भरताना कोणीही जास्त टेन्शन न घेता काम पूर्ण करावे
मानकांच्या डॉक्युमेंट्स pdf कशी तयार करावी?
`उत्तर`
1) दिलेल्या 128 मानकांना क्लिक केल्यावर तुम्हाला त्यात पुन्हा 4 स्तर दिसतील.
2) मानकात जे वर्णन दिले आहे त्या वर्णनाशी संबंधित फोटो/डॉक्युमेंट यांची pdf कॉपी तयार करावी
`उदा•`
1) तुम्ही मानक क्रमांक 1 या विंडो ला ओपन केले त्यात तुम्हाला 4 स्तर दिसत आहेत. आपण ज्या स्तरात राहत आहात त्याच्याशी संबंधित जे काही डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत.
2) मानक क्र-2 शी संबंधित जे काही डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत
3) मानक क्र-3 शी संबंधित जे डॉक्युमेंट असतील ते तयार करावेत
या प्रमाणे ज्या मानकांचे जे जे डॉक्युमेंट तयार होऊ शकतात त्या प्रत्येक मानकांचे डॉक्युमेंट तयार करून घ्यावेत
3) प्रत्येक मानकाच्या डॉक्युमेंट्स ची एकच pdf फाईल बनवावी
👉 गुगल ड्राईव्ह ला SQAAF चे फोल्डर बनवणे व pdf फाईल अपलोड करणे-
`उत्तर-`
1) ज्या ज्या शिक्षकांकडे जेवढी मानके बनवण्याचे निर्धारित झाले आहे त्या त्या शिक्षकांनी आपापल्या गुगल ड्राईव्ह वर SQAAF नावाचे एक मुख्य फोल्डर बनवावे
2) त्या मुख्य फोल्डर च्या आत तुम्हाला ज्या ज्या क्रमांकाच्या मानकाचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्या प्रत्येक मानकाच्या क्रमांकाचे पुन्हा एक मुख्य फोल्डर बनवून घ्या
3) प्रत्येक मानकाच्या फोल्डर च्या आत असलेल्या प्रत्येक मानाकाची वेगवेगळी माहिती देणाऱ्या डॉक्युमेंट्स ची एक वेगळी वेगवेगळी pdf फाईल बनवायची आहे
उदा०
मानक क्रमांक 1प्रत्येक मानकांची माहिती देणारी फोटो व इतर घटकांची एकत्रित pdf फाईल बनवावी
उदा०
👉मानक क्र -1 मध्ये
अ) मानक क्र - 1 हा मुख्य फोल्डर तयार होईल
👉 या मानक क्र - 1 च्या फोल्डर आत मानकांची माहिती देणाऱ्या pdf फाईल असतील*
*क) त्या प्रत्येक pdf फाईल ला...
पुराव्याचे नाव द्यावे उदाहरणार्थ
HPCL
विद्यार्थी संचयी
पाठ नियोजन नमुना
अशी नावे द्यावीत व त्या त्या फाईल ची लिंक त्या मानकाला क्लिक करून लिंक कॉपी करा व मगचSQAAF च्या मानकाच्या संबंधित ड्राईव्ह च्या विंडो मध्ये पेस्ट करायची आहे व सबमिट बटण क्लिक करायचे आहे
👉 अपलोड केलेल्या प्रत्येक मानकांच्या उप फोल्डर च्या pdf फाईल ला "anyone with the लिंक" हा access देणे -
1) तुम्ही प्रत्येक मानकांची जी pdf फाईल तुमच्या SQAAF फोल्डर मध्ये अपलोड केली आहे त्या PDF फाईल च्या उजव्या बाजूला जे तीन बिंदू आहेत त्याला क्लिक करा
2) त्यात 1/2 नंबर चा पर्याय Share / manage access ला क्लिक करा
3) आता तुम्हाला 2 नंबरचे Restricted हे असा विंडो दिसेल त्यावर क्लिक करा
4) पुन्हा Restricted असा विंडो दिसेल. त्यावर क्लिक करा
5) आता Anyone With the link यावर क्लिक करा व अपडेट झाल्यावर ड्राईव्ह च्या बाहेर या
प्रत्येक मानाकाच्या फाईल ची गुगल ड्राईव्ह लिंक बनवणे -
SQAAF या मुख्य फोल्डर च्या आत तुम्ही प्रत्येक मानकांच्या ज्या pdf फाईल अपलोड केल्या आहेत त्या प्रत्येक pdf फाईल ची लिंक बनवायची आहे
1) pdf फाईल च्या उजव्या बाजूला जे 3 बिंदू दिले आहेत त्याला क्लिक करा.
2) आता तुम्हाला 4 थ्या क्रमांकावर copy link चा पर्याय दिसेल. त्यावर फक्त क्लिक करा. त्या मानकाच्या pdf फाईल ची लिंक आपोआपच कॉपी होईल.
3) आता ती लिंक त्या त्या मानकाचा नंबर देवून तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअप अकाऊंट वर कॉपी करून पेस्ट करा
4) अशा रीतीने प्रत्येक शिक्षकाने त्यांना जेवढ्या मानकांचे काम करायचे आहे तेवढ्या मानकांच्या लिंक तयार करून घ्या
SQAAF च्या साईट वर त्या त्या मानकांचा विंडो ओपन करून त्या त्या मानकाच्या गुगल ड्राईव्ह ची लिंक भरणे व माहिती सबमिट करणे*
1) SQAAF ची साईट ओपन करा
2) तुम्हाला ज्या मानकाची गुगल ड्राईव्ह ची लिंक भरायची आहे ते मानक ओपन करा
3) आता त्या मुख्य मानकातील प्रत्येक उपमानकाची गुगल ड्राईव्ह ची लिंक जी तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप वर पेस्ट करून ठेवली आहे ती पुन्हा कॉपी करा. जर अगोदरच तुम्हाला कोणत्या उप मानकाची लिंक भरायची आहे हे तुमचे निश्चित झाले असेल तर अगोदरच त्या मुख्य मानकाच्या उप मानकाची लिंक कॉपी करून SQAAF ड्राईव्ह ओपन करा
4) आता जे मानक तुम्ही ओपन केले आहे त्यातील ज्या उप मांकाची लिंक तुम्हाला भरायची आहे त्या उप मान कावर क्लिक करा. ताबडतोब ते उप मानक आकाशी रंगाचे होईल
5) आता सर्वात खाली "पुरावे" या विंडो वर या.
6) "उपरोक्त विषयांचे समर्थन करणारी....." असे वाक्य ज्या विंडो मध्ये लिहिले आहे त्या विंडो वर क्षणभर बोट दाबून धरा
तुम्हाला paste असा शब्द दिसला की त्यावर क्लिक करा व तुम्ही उप मानकाची जी लिंक कॉपी केली होती ती पेस्ट करा
7) ताबडतोब तुम्हाला सबमिट हे बटण हाय लाईट झालेले दिसेल त्यावर क्लिक करा व माहिती सबमिट करा
8) अशा रीतीने सर्व मुख्य मानकांच्या उप मानकांची लिंक भरा व सबमिट करा व SQAAF चे काम पूर्ण करा
शाम माने
SQAAF राज्य मार्गदर्शक
9325791593
9637697260
मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा
आपली प्रतिक्रिया व सूचना