Ads Area

Scholarship Exam Class Five And Eight Objection On Interim Answer Key

शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2026

इ. 5 वी व 8 वी अंतरिम उत्तरसूची व 

आक्षेप नोंदणी प्रक्रिया 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व संचनिहाय अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

➤ ​महत्त्वाचे मुद्दे :

➤ आक्षेप नोंदणी : उत्तरसूची किंवा प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत काही आक्षेप असल्यास, ते संबंधित संकेतस्थळावर दिनांक १७/०३/२०२६ पर्यंत नोंदवता येतील.

➤ नोंदणी पद्धत : शाळांना त्यांच्या लॉगीनमधून, तर पालकांना संकेतस्थळावरील थेट लिंकद्वारे आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

➤ माहिती दुरुस्ती : शाळा किंवा विद्यार्थ्यांच्या अर्जातील माहितीत काही दुरुस्ती (उदा. नाव, जन्मतारीख इ.) आवश्यक असल्यास, त्याबाबतचा अर्जही शाळा लॉगीनमध्ये उपलब्ध आहे.

➤ मुदत :  विहित मुदतीनंतर (१७ मार्च २०२६ नंतर) प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा किंवा दुरुस्ती अर्जांचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-

१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल.

२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक १०/०३/२०२६ ते १७/०३/२०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.

४) दिनांक १७/०३/२०२६ नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.

६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.

७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

➤ खालील लिंक वर क्लिक करा 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 

What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin No


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area