Har Ghar Tiranga Mohim Upakram All Information

हर घर तिरंगा २०२६ मोहीम राबविण्याबाबत !शासन परिपत्रक निर्गमित 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून सन २०२२ पासून "हर घर तिरंगा" ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे, ही सदर उपक्रम राबविण्यामागील मूळ कल्पना आहे. "हर घर तिरंगा" मोहीम लोक चळवळ बनली असून या मोहिमेंतर्गत महाराष्ट्र राज्याने लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. सन २०२६ मध्ये सुद्धा सदर मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे.

त्यानुषंगाने सन २०२६ मध्ये "हर घर तिरंगा मोहीम केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे दि. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीमध्ये राबविण्याचे नियोजन राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे. यावेळी वंदेमातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने यावर्षीच्या अभियानाची संकल्पना "वंदे मातरम्" च्या १५० वर्षांच्या स्मरणाशी जोडण्यात आलेली आहे. तसेच दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी "फाळणी भयावहता स्मृती दिन" देशभरात विविध स्मरण व जनजागृतीपर उपक्रमांद्वारे पाळण्यात येणार आहे. राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानी मोहिमेच्या अंमलबजावणी करण्याकरीता केंद्र व राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून खालीलप्रमाणे नमूद सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी

तात्काळ नियोजन करण्यात यावे. सोबत केंद्र शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना तथा सादरीकरणाची प्रत सोबत सुलभ संदर्भासाठी जोडण्यात येत आहे.

"घरोघरी तिरंगा - २०२६ मोहिमेतील उपक्रम :

कालावधी ९ ते १७ ऑगस्ट २०२६

ब. उपरोक्तप्रमाणे उपक्रमनिहाय "घरोघरी तिरंगा" या मोहिमेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांनी खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

१. दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रत्येक शासकीय/निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच, प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारणेसाठी नागरीकांना प्रोत्साहीत करावे.

२. लवकरात लवकर (शक्यतो) २ ऑगस्टपासून तिरंगा रोषणाई आणि प्रक्षेपण सुरू करावे. तिरंगी रोषणाई आणि सजावटीद्वारे जास्तीत जास्त हर घर तिरंगा मोहिमेविषयी अधिकाधिक दृश्यमानता व आठवण करून द्यावी. इमारती, स्मारके, पूल इत्यादी ठिकाणी तिरंगी सजावट आणि रोषणाई करावी.

३. सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी शहरातील नागरिकांना तिरंगा उपलब्ध व्हावा याकरीता नियोजन करावे.

४. उपक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी महिला बचत गट, विविध स्वयंसेवी संस्था, रहिवासी कल्याण संघ, तसेच स्थानिक प्रसार माध्यमांचा उपयोग करण्यात यावा. शाळा, महाविद्यालये यामध्ये NSS, NCC च्या विद्यार्थ्यांना तिरंगा स्वयंसेवक (Tiranga Volunteers) नेमून जनजागृती करण्यात यावी.

५. शाळा, महाविद्यालये यांना भेट देऊन घरोघरी तिरंगा उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना व्यापक प्रमाणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे.

६. शहरातील शासकीय इमारती, मुख्य ठिकाणे, चौक, दुभाजक / पथदिवे, तलाव, उद्याने, प्रवेशद्वार, मुख्य बाजारपेठामधील चौक / सार्वजनिक जागा इत्यादी ठिकाणी तिरंगा रोषणाई करून शहरामध्ये राष्ट्रीय उत्सवाचे व देशभक्तीचे वातावरण निर्माण करावे.

७. घरोघरी राष्ट्रध्वज उभारणीसाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा.

८. सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यालयाच्या विविध वाहनाद्वारे मोठ्या प्रमाणावर तिरंगा गीत ध्वनीक्षेपित करावे. तसेच शहरातील मुख्य ठिकाणी, सोबतच परवानाधारक खाजगी डिजिटल जाहिरात फलक यांच्या माध्यमातून सुद्धा तिरंगा गीत ध्वनीक्षेपित करण्याची व्यवस्था करावी.

९. केंद्रिय गृह विभाग यांच्या दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार भारतीय ध्वज संहिता २००२ भाग-१ मधील परिच्छेद १.२ मधील राष्ट्रध्वज हे "हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर/सुत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल", या तरतूदीमध्ये बदल करण्यात आला असून सदर बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत / पॉलिस्टर / लोकर / सिल्क / खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतूदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल.

१०. भारतीय ध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे व जाणते अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीव-जागृती करावी.

११. "घरोघरी तिरंगा" या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाची सेल्फीज, छायाचित्रे, चित्रफिती, ध्वनीमुद्रण इ. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या harghartiranga.com या संकेत स्थळावर अपलोड करावे.

१२. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्व सामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करुन सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा.

"घरोघरी तिरंगा" मोहीम राबविण्यासाठी उपरोक्त सूचना लक्षात घेऊन सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी मोहीमेचे परिपूर्ण नियोजन करून यशस्वीरीत्या अंमलबजावणी करावी. तसेच याबाबतचा दैनंदिन अहवाल नगरपरिषद प्रशासन संचालनालयास देण्यात येणाऱ्या विहित नमुन्यात सादर करावा.

What's Up Grotup Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now

Post a Comment

आपली प्रतिक्रिया व सूचना

Previous Post Next Post