Baldivas Saptah Balsahity E Sanmelan

बालदिवस सप्ताह 

बालसाहित्य ई - संमेलन 

दिनांक 14 नोव्हेंबर 2020


 नमस्कार,
यावर्षी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन तथा देशभरात साजरा होणारा बालदिन (१४ नोव्हेंबर) म्हणजे बालकांसाठी आनंदाचा, उत्साहाचा दिवस. यावर्षी बालदिन दिवाळीच्या दिवशी येत आहे

 हा योगायोग लक्षात घेऊन. बालमनातील सृजनशक्तीचे आणि  गगन भरारी घेणाऱ्या प्रतिभेचे दर्शन व्हावे याकरिता
  शिक्षणमंत्री मा. ना. वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्यस्तरीय बालसाहित्याचे ई संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

शाळांच्या चार भिंतीत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळत असते..

 मनातील कल्पनांना शब्दांचे  ताकद मिळते... अशा प्रतिभासंपन्न आणि भविष्याच्या वाटचालीत मराठी साहित्यात योगदान देऊ पाहणाऱ्या बाल साहित्यिकांच्या या संमेलनात आपणा सर्वांनाच आनंदाचे क्षण अनुभवता येणार आहेत.
 साहित्य यात्रेत मा. मंत्री महोदय स्वत:ही आपल्याशी संवाद साधणार आहेत. 
 संमेलनात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी होत आहेत

 आपणही या बालसाहित्य ई संमेलनात सहभागी होऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करुया. नव्या उमलणाऱ्या साहित्य कळ्यांना फुलण्यासाठी बळ देऊया..चला तर...
Live

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad