Cyber ​​Security Training For Student

सायबर सुरक्षा सत्र प्रशिक्षण

वर्ग 6 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांकरिता

 आयोजित सायबर सुरक्षा सत्रास

 उपस्थित राहणेबाबत...


उपरोक्त विषयास अनुसरून, कोव्हीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन शिक्षणास महत्व प्राप्त झाले आहे.

 ऑनलाईन शिक्षणाकरिता मोबईल,लॅपटॉप,कॉम्पुटर या साधनांचा तसेच इंटरनेटचा वापर वाढला आहे.सतत ऑनलाईन राहण्यामुळे विद्यार्थी विविध अॅप व ऑनलाईन गेम यांकडे आकर्षित होत आहेत. 

तसेच अशा आकर्षणाना विद्यार्थी बळी पडण्याची शक्यता वाढली आहे.

 या सर्व बाबींचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावरही होत आहे

त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवत असताना विद्यार्थी , पालक व शिक्षक यांना याबाबतचे फायदे व धोके याविषयी योग्य माहिती होणे आवश्यक आहे.

या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ,पुणे आणि रोटरी क्लब ऑफ पूना वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने

 राज्यातील इ.६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी १ तासाचे ऑनलाईन सायबर सुरक्षा सत्र

 दिनांक 09 जानेवारी 2021 रोजी दुपारी 4.00 ते 5.00 या वेळेमध्ये आयोजित करण्यात येत आहे.

Digitalbrc.in

 सदर सत्रामध्ये खालील बाबींचा समावेश असेल,

१. राज्यातील वर्ग ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी १ तासांचे ऑनलाईन सत्र आयोजित केले जाईल.

 २. सदर सत्रामध्ये इंटरनेट साधने व स्मार्ट फोन यांचा सुरक्षित वापर , समाज माध्यमांचा जबाबदारीने वापर,ऑनलाईन गेमिंग,इंटरनेटचा अतिवापर ऑनलाईन

पालक व घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींशी संवाद, 

इ.घटकांचा समावेश असेल.

३. सदर सत्र मराठी भाषेमध्ये घेण्यात येणार आहे.

४. सदर ऑनलाईन सत्राचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र पुणे करण्यात येणार असून  सदर सत्रास जॉईन करावे. यासाठी

५. सहमागी विद्यार्थ्यांना सत्राच्या शेवटी लिंकद्वारे उत्तर चाचणी देण्यात येईल. उत्तर चाचणी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अंतिम सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल. खालील Link वर क्लिक करा

Feedback from

यांच्या YouTube चॅनेलच्या माध्यमातून

उपरोक्त प्रमाणे आयोजित ऑनलाईन सत्रासाठी राज्यातील इ.६ वी ते १० वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित शाळांना याविषयी अवगत करण्यात यावे 


(राहुल द्विवेदी भा.प्र.से)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषद,महाराष्ट्र, पुणे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad