चित्रकला स्पर्धा किशोर
सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त
विषय : कोरोना
किशोर मित्रांनो, कोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत आपल्याला वेगवेगळे अनुभव घेत आहोत.
सुरक्षा म्हणून मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे सतत हात धुणे, इत्यादी गोष्टी आता आपल्या चांगल्याच सवयी रुजले आहे , या काळात तुमच्याही मनात अनेक विचार येत असतील.
याबाबत आपल्याला वेगवेगळ्या कल्पना सुचत असतील. तुमचे विचारांना आणि भावभावनांना आता तुम्ही चित्राच्या रूपात मांडायचं आहे आणि तुम्हाला सुचलेले आणि कागदावर उतरलेले कोरोनाविषयक चित्र आम्हाला पाठवायचे आहे.
चला तर मित्रांनो , चित्र रंगवूया
चित्र पाठवू या
स्पर्धेचे नियम :
ही स्पर्धा चौथी ते नववीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे.
आर्टवर्क A-4 किंवा A-3 आकारात असावे.
चित्र कोणत्याही कोऱ्या कागदावर काढता येईल
चित्रासाठी कोणतेही माध्यम वापरता येईल. उदा. जलरंग, अॅक्रेलिक, क्रेयॉन, चारकोल,
रंगीत पेन्सिल, तैलरंग, स्केचपेन इत्यादी
चित्र पोस्टाने किंवा ई-मेलने पाठवू शकता.
पाकिटावर किंवा ई-मेलमध्ये
'किशोर चित्रकला स्पर्धेसाठी' असा उल्लेख असावा.
आकर्षक बक्षिसे
১ चित्र तुम्हांला सुचलेले आणि स्वतंत्र असावे.
৯ विजेत्या पाच चित्रांना आकर्षक बक्षिसे दिली जातील आणि ती किशोर अंकातून प्रसिद्ध होतील.
चित्रांसोबत तुमचे पूर्ण नाव, पत्ता, इयत्ता, संपर्क क्रमांक लिहा.
चित्र पाठवण्यासाठी अंतिम
दिनांक ३१ मे २०२१.
১ परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
चित्र पाठवण्यासाठी पत्ता
कार्यकारी संपादक, किशोर
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,
'बालभारती', सेनापती बापट मार्ग,
पुणे ४११ ००४.
इ-मेल - Email
executive_editor_kishor@ebalbharati.in
संपर्क क्रमांक : 0२०२५७१६१४४


आपली प्रतिक्रिया व सूचना