माहे मार्च २०२१ मध्ये महिला शिक्षकांकरिता शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण कार्यक्रम या विषयाच्या ऑनलाईन प्रशिक्षणाबाबत...
World Womens Day
उपरोक्त विषय व सदर्भीय पत्रानुसार, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय व केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील सर्व महिला शिक्षकांकरिता ऑनलाईन प्रशिक्षणाचे शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण विषयाबाबत ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील प्रशिक्षण कार्यक्रम माहे मार्च २०२१ मध्ये आयोजन होणार आहे.
महिला दिन विशेष
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात जागतिक महिला दिनी दिनांक ८ मार्च २०२१ रोजी होणार आहे.
कालावधी दिनांक 8 मार्च 2021 ते दिनांक 26 मार्च 2021
दोन आठवड्यांचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम हिंदी व इंग्रजी भाषेत असून एकूण २८ सत्रांमध्ये आयोजित होणार आहे.
ऑनलाईन प्रशिक्षण
ऑनलाईन प्रशिक्षण सत्र हे प्रत्येक दिवशी दोन सत्र, एका सत्राचा कालावधी ९० मिनिटे राहिल
सदर Physical Education ऑनलाईन प्रशिक्षणात जगातील उत्कृष्ट प्रशिक्षकांकडून शिकण्याची संधी महिला शिक्षकांना उपलब्ध होत आहे, याद्वारे शारीरिक सुदृढता व आरोग्य या क्षेत्रात महिलांना सक्षम होता येईल.
प्रशिक्षणात सहभाग
- सदर प्रशिक्षणाला प्राथमिक स्तरावर शारीरिक शिक्षण विषयाच्या कृती घेणाऱ्या शिक्षिका ,माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या वर्गाना शारीरिक शिक्षण विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षिका तसेच समुदाय प्रशिक्षक शिक्षिकांना यामध्ये सहभागी होता येईल
- सदरील प्रशिक्षण निःशुल्क आहे. प्रशिक्षणाकरिता ७० टक्के उपस्थिती आवश्यक असल्यास सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
- सदर प्रशिक्षणात सहभागीना ऑनलाईन चाचणी परीक्षेत ६० टक्के गुण मिळाल्यास गुणवत्ता प्रमाणपत्र मिळणार आहे.
- इच्छुक शिक्षिका सहभागी होऊ शकता
- प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षिका सहभागी होऊ शकता


आपली प्रतिक्रिया व सूचना