Ads Area

Summer Vacation To School In State

शाळांच्या उन्हाळी सुटटयांबाबत

राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माधमिक शाळांच्या सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील सुटटयांबाबत.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळांची सुटी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुटट्टयाबाबत खालील सूचना आपण जिल्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकिय अशासकिय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना दयाव्यात.

सुटटीचा कालावधी

  •   दिनांक १ मे, २०२१ शनिवार पासून शाळेला उन्हाळी सुटटी लागू करण्याबाबत सूचना द्याव्यात. सदर सुटटीचा कालावधी दिनांक १३ जून २०२१ पर्यंत ग्राहय धरण्यात यावा 
  •  पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२

मध्ये  दिनांक१५ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात. 

  •  जून महिन्याचे विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुटटीनंतर सोमवार दिनांक २८ जून, २०२१ रोजी शाळा सुरू होतील.
  •  शाळांतून उन्हाळयाची व दिवाळीची दीर्घ सुटटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी तो समायोजनाने संबंधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांच्या परवानगीने देण्यात येते.
  •  माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुटटया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.
  •  सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालीका, सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या बंद आहेत. सबब सन २०२१ २२ या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबत कोव्हिड १९ च्या प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थती विचारात घेवून शासन स्तरावरून वेळोवेळी जे आदेश निर्गमित होतील ते यथावकाश संचालनालयाकडून निर्गमित करण्यात येतील.


शासन परिपत्रक

शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे १.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad