सन 2021-22 मधील वर्ग 11 वी
प्रवेश प्रक्रियेबाबत
राज्यातील सहा महानगर क्षेत्रांतील (मुंबई एमएमआर, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच नागपूर, नाशिक, औरंगाबाद व अमरावती महानगरपालिका क्षेत्र) इ. 11वी चे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात आणि उर्वरित महाराष्ट्रातील इ. 11वी प्रवेश स्थानिक पातळीवरून केले जातात. दरवर्षी इ. 11वी प्रवेश प्रक्रिया साधारणपणे राज्य मंडळ इ.10वी परीक्षेचा निकाला जाहीर झाल्यानंतर सुरु होते.
कार्यपद्धती नाही
राज्यातील सन 2021-22 मधील इ. 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आलेली नाही. तथापि काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी सन 2021-22 साठी इ.11वी प्रवेश प्रक्रिया सुरु केले असलेचे व त्यासाठी गुगल फॉर्म सारख्या Social Media माध्यमांद्वारे अर्ज मागविणे सुरु केले असलेचे निदर्शनास आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.
दिशानिर्देश
तरी, याद्वारे कळविण्यात येते की, राज्यातील 2021-22 मधील इ. 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी सविस्तर दिशानिर्देश, शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर कळविण्यात येतील. तत्पूर्वी कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रिया आपले स्तरावर सुरु करु नये व विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होईल अशाप्रकारच्या सूचना दिल्या जाऊ नयेत, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी व पालकांना याबाबत अवगत करावे.
(द.गो.जगताप)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)


आपली प्रतिक्रिया व सूचना