शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत
स्वयंमूल्यांकन पूर्ण करणे
विषय:- सन २०२०-२१ करिता शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत स्वयंमूल्यांकन पूर्ण करणेबाबत....
संदर्भ:- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र क्र. राशसंप्रथम संकीर्ण / शासि / २०२१/१२६९ दि. ३०/०३/२०२१.
Shala Siddhi Program
राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण करून घेणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करून घेणे यासाठी राष्ट्रीय स्तरावरील शाळासिद्धी हा कार्यक्रम राज्यात सुरु आहे.
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये, शाळासिद्धी अंतर्गत सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील १००% शाळांचे स्वयं मूल्यांकन निपा, नवी दिल्ली यांचे वेब पोर्टल वर त्वरित पूर्ण करणे आवश्यक होते.
सोबतच्या सद्यस्थिती अहवालानुसार राज्यातील २४% शाळांचे स्वयं मूल्यांकन अद्यापि बाकी आहे.
In-progress आणि Not Started शाळांचे स्वयं मूल्यांकन त्वरित पूर्ण करून घ्यावे.
पोर्टल वर माहिती भरतांना काही तांत्रिक अडचण आल्यास शाळांनी समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्याच्या संगणक प्रोग्रामर यांचेशी संपर्क साधावा.
त्यांचेकडून अडचणींचे निराकरण न झाल्यास जिल्हा / मनपा कार्यालयाने मप्राशिप कार्यालयाचे संगणक प्रणाली विश्लेषण विभागाचे प्र. उप संचालक श्री गजानन पाटील (९३२३३३८५४३) यांचेशी संपर्क करावा.


आपली प्रतिक्रिया व सूचना