माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र
विद्यार्थी माहिती दुरुस्ती
वर्ग १०वी परीक्षा सन २०२१ साठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या नाव, जन्मतारीख, विषय व तत्सम माहितीमधील दुरुस्त्यांबाबत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षा सन २०२१ कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे उदभवलेल्या - असामान्य परिस्थितीमुळे महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय क्र. परीक्षा ०५२१/प्र.क्र.३९/एसडी-२ दि. १२/०५/२०२१ अन्वये रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन कार्यपध्दतीबाबतचा तपशील शासन निर्णय क्रमांक परीक्षा ०५२१/प्र.क्र.४३/एसडी २ दि. २८.०५.२०२१ नुसार जाहीर करण्यात आला आहे. तद्नंतर राज्य मंडळाने मूल्यमापन कार्यपध्दतीसंदर्भात दि.०९.०६.२०२१ च्या परिपत्रकाव्दारे तपशीलवार सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षा सन २०२१ रद्द करण्यात आल्याने संबंधित विद्यार्थ्यांना मंडळाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार प्रवेशपत्र उपलब्ध करून दिलेली नाहीत.
मात्र सुधारित मूल्यमापन पध्दतीनुसार विद्यार्थीनिहाय गुणदान करण्यासाठी विद्यार्थ्याचे नाव, बैठक क्रमांक व अनुषंगिक तपशील माध्यमिक शाळांना उपलब्ध करून दिलेला आहे. सदर तपशीलामधील
१) विषय / माध्यम
२) फोटो
३) विद्यार्थ्याची स्वाक्षरी
४) विद्यार्थ्याचे नाव
५) जन्मतारीख
६) जन्मस्थान व
७) इतर तत्सम दुरूस्त्या असल्यास याबाबत संबंधित शाळांनी प्रचलित पध्दतीप्रमाणे संबंधित विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करणेबाबत संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व सर्व माध्यमिक शाळा यांना आपल्या स्तरावर सूचित करावे. सर्व विभागीय मंडळांनी यासंदर्भातल्या दुरूस्त्या विभागीय मंडळातील / निर्धारित गणकयंत्र विभागामार्फत करून राज्य मंडळाने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीनुसार राज्य मंडळाच्या गणकयंत्र विभागाकडे पाठवाव्यात.
तरी उपरोक्तप्रमाणे दुरुस्त्या करणेबाबत सर्व माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, पालक व इतर संबंधित घटक इत्यादींनी नोंद घ्यावी.
( डॉ. अशोक भोसले) सचिव, राज्य मंडळ, पुणे ०४.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे


आपली प्रतिक्रिया व सूचना