Starting Academic Year About This Year

 शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ सुरू 

करणेबाबत

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष

सन २०२१-२२ सुरू करणेबाबत

संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र क्र. अमाशा/शासू/एस-१/१५५८, दिनांक ३०.०४.२०२१ २. मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे व्हि. सी. मधील संदेश दिनाक १४.०६.२०२१


उपरोक्त विषयी व संदर्भान्वये  नुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना संदर्भ क्र. ०१ नुसार दिनांक १४ जून २०२१ पर्यंत व विदर्भासाठी दिनांक २७ जून पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. 

त्यानुसार दिनांक १५ जून, २०२१ पासून राज्यातील (विदर्भ वगळता) शाळांचे शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ पासून सुरु करण्यात येत आहे. 

विदर्भातील शाळांचे शैक्षणिक वर्ष

 दिनांक २८.०६.२०२१ पासून सुरू होईल.

 शाळेमध्ये / कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पुढील प्रमाणे शिक्षकांची उपस्थिती आवश्यक राहील. 

१. इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वीचे ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील.

२. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी चे १०० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील. 

३. शिक्षकेतर कर्मचारी यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील.

४. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी १००

टक्के उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीचा निकाल तयार करण्यासाठी मुल्यांकनाचे काम सुरू असून मर्यादित वेळेत सदर निकाल घोषीत करावयाचा असल्याने राज्यातील विदर्भासह इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीला शिकविणाऱ्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील याबाबत सर्व संबंधित व्यवस्थापनांना सूचना निर्गमित कराव्यात.

बृहन्मुंबई शहरातील शिक्षकांच्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील उपस्थिती करीता त्यांना लोकल

प्रवासाच्या सोयीबाबत शासन स्तरावरून यथोचित सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

कोविड १९ परिस्थितीमुळे पुढील सुचनेपर्यंत शाळा बंद असल्यातरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (SCERT) यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे

 ऑनलाईन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीतपणे सुरू राहील यांची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

याबाबत सर्व क्षेत्रीय यंत्रणांना वरीलप्रमाणे निर्देश देण्यात यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा

शासन परिपत्रक

(द. गो. जगताप)

शिक्षण संचालक

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad