Learn with Fun For Student

शिकू आनंदे

शाळा बंद पण शिक्षण सुरू

शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. 

 शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्तआहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या  शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये  निर्माण होऊ शकतात, या बाबीचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत  इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित   दर शनिवारी online पद्धतीने “शिकू  आनंदे ” (Learn with Fun) हा उपक्रम

 दिनांक ३ जुलै २०२१ पासून सुरु करत आहोत. मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती  पहाव्यात,  कराव्यात,  कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकवीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे

प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळ असेल. यामध्ये सकाळी  ९ ते १० या वेळेत इयत्ता १ ली ते ५ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी १० ते ११ या वेळेत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कला,शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत. . याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी.व जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग असण्याकरिता ड्रॉईंग कागद,

पेन्सिल,खोड रबर,वॉटर कलर, स्केच पेन,पट्टी, ब्रश, क्ले, ओली माती इत्यादी साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत ठेवावे.

सदरील कार्यक्रमध्ये सहभागी होता येईल
   


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad