राज्यात दिनांक 17 ऑगस्टपासून शाळांची घंटा वाजणार
वर्ग 5 वी ते 12 वीचे वर्ग शाळा सुरू करणेबाबत
नवीन शासन निर्णय जाहीर
आजचा नवीन शासन निर्णय
परिपत्रक
७. त्यानुषंगाने दिनांक १७ ऑगस्ट, २०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच दिनांक २ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानूसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहील्या टप्प्यात इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना
कोविडमुक्त गावात तेथे वर्ग 5 वी ते 12 वीचे वर्ग शाळा सुरू करणेबाबत आजचा शासन निर्णय
वर्ग १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थी करिता इयत्ता ९ वी व ११ वी हा पाया असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी कोविड-मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती
१) ग्रामीण भागात कोविड-मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा.
ग्रामपंचायत स्तरावर संरपंच यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे समिती गठीत करावी.
१. सरपंच,
२. तलाठी
३. अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती
४. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र
५. ग्रामसेवक
६. मुख्याध्यापक
७. केंद्रप्रमुख
समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी.
(i) शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळून आला नसावा.
(ii) शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करणे बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व शिक्षण अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे
पाठपुरावा करावा.
(ii) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
(iv) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थीचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.
२) शाळा सुरू करताना मुलांना टप्या-टप्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना SOP) चे पालन करावे.
कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.
शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
१. वरील सर्व बाबींचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी शिक्षणाधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्या समवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक तेथे सूचना कराव्यात
शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना (SOP ) सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ व परिशिष्ट ब मध्ये देण्यात येत आहेत.
२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२१०७०७१४४०१९३८२१ असा आहे
परिशिष्ट-अ
शाळा सुरु करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना
१. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे
. मुलांना सुरक्षित व आरोग्यदायी वातावरणात शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळेने विद्यार्थी शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आजारी पडल्यास त्यांचे अलगीकरण व त्यांच्यावर काय उपचार करावेत ? शाळा तात्पुरती बंद करावी लागल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी करावयाच्या उपाय योजना याचा कृती आराखडा तयार करावा.
. • शाळा सुरु करण्यापूर्वी शाळेमध्ये मुलांनी यावे या साठी शाळा व्यवस्थापन समितीने “चला मुलांनो शाळेत चला" (Back to School) अशी मोहिम राबवावी.
शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे.
तापमापक (Thermometer), जंतूनाशक, साबण पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावे. वापरण्यात येणारे तापमापक हे calibrated contactless infrared digital thermometer असावे.
ज्या ठिकाणी वाहतूक सुविधेचा वापर करण्यात येणार अशा शाळांनी
वाहतुक सुविधांचे वेळो वेळी निर्जंतुकीकरण करावे.
एखाद्या शाळेत विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन सेंटर) असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थलांतर करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करुन हस्तांतर शाळेकडे करावे.
विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन सेंटर) इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.
२. शिक्षकांची कोविड- १९ बाबतची चाचणी
• संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड १९ साठीची RTPCR चाचणी करावी.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सदर चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. सदर प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करावी
• ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल positive असतील त्यांनी कोविड मुक्त झाल्यानंतरच शाळेत उपस्थित राहवे. शाळेच्या प्रमुखांनी आजारी असल्याच्या कारणामुळे कर्मचान्यास रजेवर राहण्याची परवानगी देण्यात यावी.
• ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल negative आहेत त्यांनी शाळेत उपस्थित राहताना कोविड- १९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच कोविड १९ बाबतची लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरीत चाचणी करावी..
३. बैठक व्यवस्था
परिशिष्ट ब


आपली प्रतिक्रिया व सूचना