Ads Area

INSPIRE Award MANAK Scheme Session

 INSPIRE Award MANAK योजना सत्र 2020-21 DLEPC व SLEPC Online आयोजित होणार


                इयत्ता ६ वी ते १० वी

सन २०२०-२१ या सत्रातील निवडपात्र महाराष्ट्रातील सर्व ३१३९ विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय INSPIRE Award MANAK प्रदर्शन (DLEPC तथा SLEPC) चे आयोजन करावयाचे आहे.
 त्यानुसार जिल्हास्तरीय INSPIRE Award MANAK प्रदर्शन आयोजित करण्याबाबत सूचना पुढीलप्रमाणे:

 1. कोविड परिस्थिती मुळे २०२०-२१ या सत्रातील जिल्हास्तरीय INSPIRE Award MANAK प्रदर्शन (DLEPC) ONLINE पद्धतीने होणार आहे.

 2. याकरिता केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत प्राप्त सूचनेप्रमाणे सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकाच्या मदतीने Google play store मधून 'MANAK competition App डाऊनलोड करावे.

             MANAK App Download
 3. App विषयी आणि PROTOTYPE ची माहिती अपलोड करण्याविषयी सविस्तर माहिती पुढे दिलेल्या You tube

 व्हिडीओ द्वारे देण्यात आली आहे. 
4. या App द्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या निवड झालेल्या Prototype वी माहिती अपलोड करावयाची आहे. सदर

 App मध्ये VIDEO AUDIO, TEXT बाबत दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करावयाचे आहे. एकदा माहिती submit झाल्या नंतर सदर (Delete) करता येणार नाही करिता माहिती submit करण्यापूर्वी एकदा तपासून घ्यावी.

 5. अशाप्रकारे विद्यार्थ्यांची माहिती अपलोड झाल्यानंतर NIF इंडिया, अहमदाबाद यांचे मार्फत मूल्यमापन समिती द्वारा विद्यार्थ्यांच्या Prototype वे online पद्धतीने मूल्यमापन केले जाईल.

 6. दिनांक 15 सप्टेंबर 2021 पर्यंत सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी त्यांचे Prototype अपलोड करावे.

 7. दिनांक 16 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत सर्व जिल्ह्यांचे DLEPC चे आयोजन करण्यात येईल.

 8. ऑक्टोबर 2021 मध्ये जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय INSPIRE Award MANAK प्रदर्शन चे आयोजन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. (याविषयी सविस्तर पत्राद्वारे कळविण्यात येईल).

9. आपल्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचे Prototype अपलोड करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा शिक्षण निरीक्षक (DNO'S) यांची असेल.

10. आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे Prototype अपलोड झाल्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी DLEPC चे आयोजन व मूल्यमापन करणेबाबत ( दिनांक 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर २०२१ दरम्यान ) राज्य विज्ञान शिक्षण संस्थेला पत्राद्वारे कळवावे, त्यानुसार मूल्यमापनाच्या तारखा NIF- इंडिया, अहमदाबाद या संस्थेद्वारा निश्चित केल्या जातील.

11. उपरोक्त प्रदर्शनाच्या सुलभ आयोजनाबाबत ONLINE बैठकीचे आयोजन करावयाचे असल्यास, आपल्या जिल्ह्यातील विज्ञान शिक्षक, जिल्हा विज्ञान मंडळ सदस्य तसेच विषय तज्ञ यांचे सह बैठकीचे आयोजन करता येईल. याबाबत मेलद्वारे या कार्यालयास कळवावे.

संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण), नागपूर

सन २०२१-२२ मध्ये इयत्ता ६ वी ते १० वी या वर्गात शिकणाऱ्या सर्व शासनमान्य (सर्व माध्यम) शाळेतील विद्यार्थ्यांचे ५ उत्तम संकल्पनेवर आधारित मोडेल्स
खालील वेबसाईट वर नामांकने सादर करावयाची आहे.

               Website

नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत
 दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आहे.
खालील मार्गदर्शन व्हिडिओ पहा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad