स्वच्छता पंधरवडा संपूर्ण राज्यात राबविणार ! जाणून घ्या
सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांमधून स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत.
तसेच राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्या द्वारा स्वच्छतेबाबत केलेल्या उत्तम कार्याचा गुणगौरव करण्यात येतो.
वर्ष 2021 च्या स्वच्छता पंधरवडा दिनदर्शिकेनुसार भारतासाठी स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची अंमलबजावणी
दिनांक 1 ते 15 सप्टेंबर, 2021 या कालावधीत करावयाची आहे.
लक्षवेधी सहभागासाठी योग्य पध्दतीने स्वच्छता पंधरवडा साजरा करुन विद्यार्थी, शिक्षक व समाज यांचा सक्रीय सहभाग घेवून साफसफाई, स्वच्छता व आरोग्य आणि शाळेतील इतर संबंधित उपक्रम करुन घेण्याकरिता शाळा/संस्था यांना या काळात खालील सूचित केलेले उपक्रम हाती घेण्यासाठी सूचना देण्यात याव्यात.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करुन सदरचे उपक्रम Online /
Offline स्वरुपात आयोजित करावेत.
1. सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांतून स्वच्छतेची शपथ घेण्याकरिता विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांचा सहभाग घेण्यात यावा.
2. स्वच्छता पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात शालेय व्यवस्थापन समिती/पालक शिक्षक संघ तसेच पालक व शिक्षक यांच्या बैठका घेण्यात याव्यात व या बैठकांमध्ये साफ सफाई व स्वच्छतेचे महत्व निर्दशनास आणून द्यावे व तसेच शाळेत व घरी आरोग्य व स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रूजविण्याबाबत प्रोत्साहित करुन प्रेरणा देण्यात यावी.
3. शिक्षकांनी शाळेतील/संस्थेतील स्वच्छता विषयक सुविधांची तपासणी करुन गरज भासल्यास त्या सुविधांची दुरुस्ती व देखभाल यासाठीची योजना तयार करावी.
4. जिल्हा / गट / केंद्र या स्तरावर स्वच्छतागृह व शालेय परिसर या विषयी स्पर्धांचे आयोजन करावे.
5. शाळेतील स्वच्छता व आरोग्यविषयक सवयी याबाबत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा / प्रश्न मंजुषा या स्पर्धांचे आयोजन करावे.
6. विद्यार्थी, शिक्षक व पालक यासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करावी.
7. स्वच्छतेवर वादविवाद स्पर्धा आयोजित करावी.
8.शाळा व संस्था यांच्या संकेत स्थळांवर स्वच्छतेच्या जागृतीचे संदेश अपलोड करणे व शाळेत स्वच्छतेवरील छायाचित्रे प्रदर्शित केले जावे.
वरील सहयोगी उपक्रमाशिवाय शिक्षक आणि शाळा प्रशासन यांच्या करिता खालील उपक्रमही हाती घेण्या
1. विहित नियमानुसार जुने रेकॉर्ड निर्लेखन करणे व अनावश्यक फाईल्स काढून टाकणे अथवा त्यांच्या नोंदी घेणे.
2. सर्व प्रकारचे खराब साहित्य, जसे की मोडकळीस आलेले फर्निचर, वापरात नसलेली सामग्री, निकामी वाहने इ. शाळा/संस्थेच्या
परिसरातून पूर्णपणे काढून टाकून योग्य कार्यपध्दतीनुसार निकाली काढावीत.
3. स्थानिक प्रतिनिधीच्या सहकार्याने शिक्षक आणि विद्यार्थी यांनी जवळच्या परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छता पंधरवडा या विषयाचा प्रचार करावा.
स्वच्छता पंधरवडा या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी व सामुहिक जाणीव निर्माण करण्यासाठी खालील
उपक्रम हाती घ्यावेत.
अ) स्वच्छता आणि जलसंवर्धनाबाबत दृकश्राव्य कार्यक्रम / IEC साहित्याची निर्मिती करुन विद्यार्थी, शिक्षक व इतरांना प्रेरीत करावे.
ब) स्वच्छता पंधरवडा ठळकपणे निदर्शनास आणण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फलकाची / बॅनरची निर्मिती करुन ते फलक शाळा / तालुका/जिल्हा / विभाग / राज्याच्या संकेत स्थळावर ते अपलोड करावेत. सामाजिक माध्यमाचा व इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मिडीया चा वापर करुन स्वच्छता पंधरवड्याची जाहिरात देवून जनजागृती निर्माण करण्यात यावी.
क) शाळा व संस्था यातील स्वच्छता अभियानासाठी समाजाचा सहभाग घेवुन जवळच्या परिसरातील स्वच्छता व जन जागृती मोहिम हाती घेण्यात यावी.
ड) स्वच्छ भारत यावर आधारित गाण्यांचे प्रसारण करण्यात यावे.
ढ) स्वच्छता पंधरवड्याच्या काळात स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी शाळेत विद्यार्थी राजदूताचे नामनिर्देशन करण्यात यावे. स्वच्छता पंधरवडा, 2021 करिता सूचविलेली कार्य योजना
(दिनांक 1 ते 15 सप्टेंबर, 2021) सोबत जोडत आहोत.
दिनांक 1 ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा कृती आराखड्याप्रमाणे मनापासून विद्यार्थी, शिक्षक, पालक स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आपण त्यानुसार COVID-19 या आजारापासून संरक्षण होण्यासाठी दिलेल्या आरोग्य व स्वच्छता विषयक सूचनांचे पालन करण्यासंबंधी शाळा / शैक्षणिक संस्था यांना आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात स्वच्छता पंधरवडा यशस्वी होण्याकरीता आपण आपल्या जिल्ह्यातील स्वछता पंधरवडा कालावधीत सहभागी होणाऱ्या शाळा व विद्यार्थ्यांची संख्या तसेच दररोज स्वच्छता पंधरवडा बाबतचे ठळक वैशिष्ट्यासह एकत्रित छायाचित्रे, व्हिडीओ चित्रफित इत्यादी
https://forms.gle/Qx9mh361uLutxE2N9
या लिंक वर अपलोड करण्यात यावेत. सर्वोत्तम सादरीकरण करणारे राज्य/केंद्रशासित प्रदेश / संस्था यांना त्याच्या स्वच्छता पंधरवड्यातील सहभागावर आधारित बक्षीस ही दिले जाणार आहे. तरी 'स्वच्छता' हा संस्कार रुजविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी.
उपरोक्त नमूद सर्व उपक्रमाबाबत तसेच सोबतच्या आराखड्यातील उपक्रमाबाबत अंमल बजावणी करतांना कोविड 19 च्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमाचे पालन करावे.
सोबत मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र व मार्गदर्शक सूचना -
मानव संसाधन विकास मंत्रालय
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग
स्वच्छता पंधरवडा दिनांक १ ते १५ सप्टेंबर २०२१ साजरा करण्याचा कृती आराखडा
दिनांक ०१/०९/२०२१ (बुधवार) स्वच्छता शपथ दिन
• विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांचा Online/ Offline सहभाग घेणे.
• COVID पासून बचावासाठी घ्यावयाची स्वच्छतेची काळजी व वैयक्तिक स्वच्छतेबाबतच्या जाणीव जागृतीचे संदेश शाळेच्या / संस्थेच्या / विभागाच्या वेबसाईटवर तसेच शाळेच्या दर्शनी भागात प्रदर्शित करणे.
• शालेय विद्याथ्र्यांना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री / सचिव / जिल्हाधिकारी/जिल्हा शिक्षणाधिकारी/ क्षेत्रीय अधिकारी इत्यादींनी संबोधित करणे.
.● स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याबाबतचे आणि स्वच्छतेच्या बाबत जाणीव जागृतीचे इलेक्ट्रॉनिक बॅनर्स
तयार करून विभागाच्या किंवा राज्याच्या वेबपोर्टलवर प्रदर्शित करणे.
• स्वच्छतेबाबत शपथ घेतलेल्या शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच शपथविधी कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ व प्रसिध्दीसंबंधीचे साहित्य
या लिंक वर अपलोड करावे.
दिनांक ०२/०९/२०२१ (गुरुवार) स्वच्छता जाणीव जागृती दिन
● विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये स्वच्छतेबाबत जाणीवजागृती निर्माण होण्याकरिता शाळा व्यवस्थापन समिती / पालक शिक्षक संघ यांची सभा गुगलमीट झूम द्वारे आयोजित करणे आणि विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शाळेमध्ये व घरामध्ये स्वच्छता करण्याबाबत प्रेरित करणे.
• शाळेतील / संस्थेमधील प्रत्येक कानाकोप-यामध्ये स्वच्छतेविषयक सुविधांची पाहणी करावी आणि आवश्यक तेथे सदर सुविधांच्या अद्ययावततेबाबत प्रस्ताव द्यावेत.
• शालेय परिसराबरोबरच शाळेमधील स्वच्छतागृहे, शालेय पोषण आहार स्वयंपाकगृह, वर्गखोल्या, फॅन, दरवाजे, खिडक्या इ. ठिकाणांचा वापर करत असतांना COVID-19 या आजारापासून संरक्षण होण्यासाठी दिलेल्या आरोग्य व स्वच्छता विषयक सूचनांचे पालन करणे.
• वरील उपक्रमांत सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच उपक्रम/कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ व प्रसिद्धीसंबंधीचे साहित्य Google Forms
या लिंक वर अपलोड करावे.
दिनांक ०३/०९/२०२१ (शुक्रवार) समुदाय पोहोच
• स्वच्छतेबाबत समाजाचे उद्बोधन करण्याकरिता सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेच्या गावामध्ये भेटी देणे. त्यांच्या भेटीचा मुख्य उद्देश लोकांनी शौचालयाचा वापर करणे आणि त्यांच्या परिसरातील कचरा व्यवस्थापनाचे काम याबाबत पाहणी करणे हा असेल. शिक्षकांनी तेथील लोकांना पाण्याच्या अपव्ययाबद्दल आणि जलसंधारणाच्या महत्वाबद्दल तसेच सध्या चालू असलेले जलशक्ती अभियान याविषयी महत्त्व स्पष्ट करावे. सदर उद्बोधन वर्ग व मेळाव्याचे आयोजन करत असतांना COVID-19 या आजारापासून संरक्षण होण्यासाठी दिलेल्या आरोग्य व स्वच्छता विषयक सूचनांचे पालन करणे.
• विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्थानिक प्रतिनिधीच्या समन्वयाने/ सहकार्याने स्वच्छता पंधरवड्याच्या महत्त्वाविषयी स्थानिक परिसरामध्ये प्रसार-प्रचार करावा.
• समुदाय पोहोच उपक्रमामध्ये सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच उपक्रम / कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ व प्रसिध्दीविषयक साहित्य
या लिंक वर अपलोड करावे.
दि.०४/०९/२०२१ व ०५/०९/२०२१ (शनिवार व रविवार) हरित शाळा अभियान
• शाळेतील विद्यार्थ्यांनी हरित शाळा विषयी घोषवाक्ये, चित्र, चित्रफित इत्यादी तयार करुन ते शाळेच्या समुहावर प्रदर्शित करावे.
प्रत्येक शाळेमध्ये कचरा पेटीची व्यवस्था करण्यात यावी. कचऱ्याच्या विभाजनाबाबत (ओला व सुका) विद्याथ्यांमध्ये जागरूकता तयार होण्याच्या दृष्टीने पुनर्वापर, योग्य कचयाकरिता निळ्या रंगाची कचरापेटी
तर पुनर्वापर न करता येणाऱ्या कचऱ्याकरिता हिरव्या रंगाची कचरापेटी वापरण्यात यावी.
● विद्यार्थ्यांना शाळेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वृक्षलागवड करून बागकाम करण्याकरिता प्रोत्साहित
करावे
. • टाकाऊ ( कचरा ) साहित्याचा पुनर्वापर करावा.
• हरितगृहाच्या परिणामांवर अंकुश ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. जुन्या संचिका, दस्तऐवज नियमानुसार
निर्लेखित करावेत.
• शाळेच्या/ संस्थेच्या आवारातील सर्व प्रकारचे तुटलेले फर्निचर वापरात नसलेले साहित्य, विस्कळीत
वाहने इ. कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावण्यात यावी.
• सदर उपक्रमामध्ये सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच उपक्रम / कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ व प्रसिध्दीविषयक साहित्य
या लिंक वर अपलोड करावे.
दि. ०६/०९/२०२१ व ०७/०९/२०२१ (सोमवार व मंगळवार) स्वच्छता सहभाग दिन
.● स्वच्छ व नीटनेटका शालेय परिसर आणि स्वच्छतागृहे याबाबत जिल्हा/तालुका/केंद्र स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे.
विद्याथ्यासाठी "कोविड 19 साठी सज्ज शाळा" या विषयावर निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करावे. स्वच्छतेबाबत निबंधलेखन / प्रश्नमंजुषा / चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे.
• सदर उपक्रमामध्ये सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच उपक्रम / कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ
व प्रसिध्दीविषयक साहित्य
या लिंक वर अपलोड करण्यात यावे.
• जिल्हास्तरावरील जिल्हा नोडल अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील निबंधलेखन व चित्रकला स्पर्धेतील प्रथम 3 क्रमांकाचे निबंध व चित्रे swachhatapakhwadamaha@gmail.com
या ईमेल दिनांक 8/9/2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावेत.
दिनांक ०८/०९/२०२१ (बुधवार)
हात धुणे दिन
• दैनंदिन जीवनामध्ये हात धुण्याचे महत्त्व याविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यात यावी.
• विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी व जेवणानंतर योग्य प्रकारे हात धुण्याच्या पद्धती शिकविण्यात याव्या.
• दिव्यांग विद्याथ्यांसाठी अडथळेविरहित पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी.
• पाण्याच्या अपव्ययाबाबत शहानिशा करावी.
• हात धुणे स्टेशनपासून ते शालेय बगीचा या दरम्यानच्या पाण्याची व्यवस्था करणे.
● उपक्रमामध्ये सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच फोटो, व्हिडीओ व प्रसिध्दीविषय
या लिंक वर अपलोड करणे.
दिनांक.०९/०९/२०२१ व १०/०९/२०२१ (गुरुवार व शुक्रवार ) वैयक्तिक स्वच्छता दिन :
● विद्यार्थी शिक्षक / कर्मचाऱ्यांना वैयक्तिक स्वच्छता राखण्याबाबत प्रेरणा देण्याकरिता दृकश्राव्य कार्यक्रमांचे आयोजन करावे. नखे कापणे व स्वच्छता राखणे याबाबत विद्यार्थ्यांना योग्य पद्धती शिकविण्यास मदत करणे.
• स्वच्छतेच्या सवयींचा संपूर्ण आरोग्यावर होणाऱ्या प्रत्यक्ष परिणामाबाबत माहिती देण्यात यावी.
• COVID-19 या आजारापासून संरक्षण होण्यासाठी दिलेल्या आरोग्य व स्वच्छता विषयक सूचनांचे पालन
करणे.
• उपक्रमामध्ये शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच उपक्रम / कार्यक्रमाचे फोटो/व्हिडीओ / प्रसिध्दी साहित्य
या लिंक वर अपलोड करणे.
दिनांक ११/०९/२०२१ व १२/०९/२०२१ (शनिवार व रविवार) शाळा स्वच्छता प्रदर्शन दिन :
• शाळेमध्ये स्वच्छतेवर आधारित छायाचित्रे, चित्रकला, कार्टून्स, घोषवाक्ये इ. Online / Offline प्रदर्शित करावीत.
• सदरच्या प्रदर्शनाचे दस्तऐवज तयार करणे.
• स्थानिक पुर्नवापरयोग्य कच्च्या मालाचा वापर करून कचराव्यवस्थापनासाठी शिल्पकलेचा उपयोग करणे. जसे की स्थानिकांच्या कौशल्यांचा उपयोग करून त्यांच्या संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी कचरापेटी तयार करणे.
• उपक्रमामध्ये सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच उपक्रम/कार्यक्रमाचे फोटो/ व्हिडीओ व प्रसिध्दीविषयक साहित्य https://forms.gle/Ox9mh361uLutxE2N9 या लिंक वर अपलोड करणे.
दि.१३/०९/२०२१ ते १४/०९/२०२१ (शनिवार व रविवार) स्वच्छता कृती दिन :
• समग्र शिक्षा योजनेंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती/शाळा व्यवस्थापन व विकास समिती मार्फत विद्यार्थी पालक आणि स्थानिक लोकांमध्ये जाणीव जागृती व स्वच्छता कृती आराखडा तयार करण्यात यावा. COVID-19 या आजारापासून संरक्षण होण्यासाठी दिलेल्या आरोग्य स्वच्छता विषयक सूचनांचे पालन करणे.
• शाळेमध्ये स्वच्छता पंधरवडा विषयक आयोजित कृतींच्याबाबत चर्चा करण्याकरिता आणि शाळेव्दारे
स्वच्छता विषयक नवीन कृतींचे आयोजन करण्याकरिता बालसंसद किंवा बालसभा Online /
Offline बोलविण्यात यावी.
• विद्यार्थ्यामध्ये व्यक्तिगत, शारीरिक, मानसिक, पर्यावरणविषय व सामाजिक स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यात यावी.
• उपक्रमांतील सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच उपक्रम/कार्यक्रमाचे फोटो व प्रसिध्दीविषयक साहित्य https://forms.gle/Qx9mh361uLutxE2N9 या लिंक वर अपलोड करावे.
दि. १५/०९/२०२१ (बुधवार) पारितोषिक वितरण दिन :
• स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला, निबंधलेखन, वादविवाद आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी शिक्षक, विद्यार्थी व पालकांना पारितोषिक वितरण करण्यात यावे. COVID-19 या आजारापासून संरक्षण होण्यासाठी दिलेल्या आरोग्य व स्वच्छता विषयक सूचनांचे पालन करणे.
स्वच्छता पंधरवडा दरम्यान सर्व शाळा / शैक्षणिक संस्थांनी आयोजित केलेल्या कृतींमधील सर्वोत्तम कृतीची निवड करून जिल्हा / राज्यस्तरीय अधिकाऱ्यांकडे पाठवून द्यावी, संबंधित कृती राज्य / राष्ट्र स्तरावरील वेबसाईटवर अपलोड करता येईल.
• उपक्रमांमधील सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच उपक्रम/ कार्यक्रमाचे फोटो व प्रसिध्दी विषयक साहित्य https://forms.gle/Qx9mh361uLutxE2N9 या लिंक वर अपलोड करावे.
उपरोक्त नमूद 'सर्व उपक्रमाबाबत तसेच सोबतच्या आराखड्यातील उपक्रमाबाबत अंमल बजावणी करतांना कोविड 19 च्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमाचे पालन करावे.


आपली प्रतिक्रिया व सूचना