खुशखबर ! राज्य कर्मचारी करिता
महागाई भत्ता 28 टक्के लागू
DA Increase Maharashtra Government
दिनांक १ जुलै, २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर १७% वरुन २८% करण्यात यावा.
सदर वाढीमध्ये दिनांक १ जानेवारी, २०२०, दिनांक १ जुलै, २०२० आणि दिनांक १ जानेवारी, २०२१ पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे.
मात्र दिनांक १ जानेवारी, २०२० ते दिनांक ३० जून, २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा दर १७ % इतकाच राहील.
28% महागाई भत्ता वाढ दिनांक १ ऑक्टोबर, २०२१ पासून रोखीने देण्यात यावी
दिनांक १ जुलै, २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकी रोखीने मिळणार
DA Calculator Salary Form Oct 2021
आपल्याला महागाई भत्ता किती मिळणार हे आपल्या मोबाईल वर पहा
एका क्लिकवर ऑक्टोंबर 2021 महिन्याचा पगार व तीन महिन्याचा महागाई भत्ता फरक पहा
आपला बेसिक पगार टाका
GO वर क्लिक करा
महागाई भत्ता काढा
महागाई भत्ता काढा
महागाई भत्ता विषयक माहिती
महागाई भत्ता विषयक माहिती
राज्य कर्मचारी यांच्या माहे- ऑक्टोबर 2021(पेड इन नोव्हेंबर2021) च्या वेतनात होणारे 3 महत्वपूर्ण बदल.
1) माहे- ऑक्टोबर 2021पासून महागाई भत्ता(DA) 17% वरुन 28% करणे...
(वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- मभवा-2019/ प्र. क्र. 30/सेवा-9 , दिनांक- 7 ऑक्टोबर 2021(शासन निर्णय संकेतांक 202110071550585405)
2) 1जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर2019 या 5 महिन्यांचा 5% महागाई भत्ता वाढी चा फरक माहे ऑक्टोबर च्या वेतना सोबत रोखीने अदा करणे...
(संदर्भ- वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- मभवा-1319/ प्र. क्र. 30/सेवा-9 , दिनांक- 7 ऑक्टोबर 2021 (शासन निर्णय संकेतांक 202110071602270505 )
3) घरभाड़े भत्ता दरात वाढ करणे...
🔸8 % वरुन 9 % (ग्रामीण भाग/ Z कैटेगरी)
🔸 16 % वरुन 18% (Y कैटेगरी शहरी क्षेत्र )
🔸24 % वरुन 27% (X कैटेगरी महानगर क्षेत्र)
(संदर्भ :- वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- घभाभ-2019 / प्र. क्र. 2 /सेवा-5 , दिनांक- 5 फेब्रुवारी 2019)
दिनांक 5फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयात स्पष्ट नमूद केलेले आहे की, जेव्हा प्रचलित महागाई भत्ता DA- दर 25% च्या वर जाईल तेव्हा घरभाड़े भत्ता(HRA) दरात X, Y, Z या प्रकारा नूसार अनुक्रमे 3% , 2% व 1% ची वाढ होईल...
त्यामुळे ज्या अर्थी आज महागाई भत्ता(DA) 17% वरुन 28% झाला आहे, म्हणजे महागाई भत्त्याची 25% मर्यादा ओलांडली गेली आहे, त्या अर्थी ऑक्टोबर महिन्या पासून घरभाड़े भत्ता (HRA) दरात देखील वरील प्रमाणे आपोआपच वाढ होईल...
तरी सर्व कार्यालय यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतन बिलात या प्रमाणे बदल करून सुधारित बिले तयार करणे आवश्यक आहे, व त्यासाठी लागणारा आवश्यक निधि वरिष्ठ स्तरावर मागणी करणे देखील आवश्यक आहे...
घरभाड़े भत्ता वाढ 5फेब्रूवारी2019शासन निर्णयात नमूद असल्याने आता त्यासाठी स्वतंत्र परिपत्र किंवा निर्णय निघण्याची शक्यता नसल्याचे मंत्रालयीन सूत्रांकडून कळाले आहे, तथापि जर शासना कडे निधिची अनुपलब्धता असेल तर शासन घरभाड़े भत्ता वाढ थांबवणे बाबत स्वतंत्र पत्र काढू शकते...
परंतु जर तसे पत्र निघाले नाही तर पूर्वीच्याच शासन निर्णयांनूसार सुधारित बदल करून घरभाड़े भत्ता मागणी नोंदवणे आवश्यक आहे..
शासन निर्णय प्रमाणे संकलित माहिती.....

आपली प्रतिक्रिया व सूचना