Shikshanotsav School Visit For School Reopen

 राज्यात आज शिक्षणोत्सव

 शिक्षणोत्सव शाळा भेट

School Reopen

#Backtoschool
शासनाने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी  अतिरिक्त मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत
 त्यानुसार दिनांक ४ ऑक्टोंबर २०२१ पासून शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
शाळा सुरु करतेवेळी प्रत्येक शाळेमध्ये शिक्षणोत्सव साजरा करावा. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनौपचारीक स्वागत करावे जेणेकरुन शाळा स्तरावर शैक्षणिक वातावरण निर्मिती होईल.

दिनांक ०४/१०/२०२१ रोजी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या (विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक इ. शाळा भेटींचे नियोजन करावे

Social media वर पोस्ट करावी

या दिवशी राज्यातील शाळांमध्ये शिक्षणोत्सव साजरा केला जाणार आहे. या दरम्यान प्रत्येक क्षेत्रीय अधिकारी यांनी शाळा भेटी दरम्यान काढलेले फोटो, व्हिडिओ हे स्वतःच्या. अथवा सहकाऱ्याच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अकाऊंट वरून पोस्ट करावयाचे आहेत.

फोटो सोबत स्वतःचे नाव, पद, भेट दिलेल्या शाळेचे नाव व यू डायस क्रमांक, भेटीचा दिनांक व वेळ याचा लिखित (टेक्स्ट) तपशील अपलोड करणे आवश्यक राहील.

भेटीच्या फोटोसोबत आपण आपल्या भेटीचा / शाळेतील कार्यक्रमाचा व्हिडीओ पोस्ट करताना तो जास्तीत जास्त २ ते ३ मिनिटांपर्यंतचा असावा. फोटो व व्हिडीओ सुस्पष्ट असेल याची काळजी घ्यावी.

फेसबुक/ इन्स्टाग्राम/ ट्विटर या समाज माध्यमावर पोस्ट करताना ती Public असावी. तसेच फेसबुकवर पोस्ट करताना Story मध्ये शेअर न करता Wall वर शेअर करण्यात यावी.

हॅशटॅगचा (#HASHTAG) वापर

पोस्ट करताना 
1) फेसबुकवर @SCERT,Maharashtra , @thxteacher, 

2) ट्विटरवर @scertmaha , @thxteacher आणि

 3) इंस्टाग्रामवर @scertmaha , @thankuteacher यांना टॅग करावं. 
पोस्ट Public असावी.

Social media वर पोस्ट करताना #MVMJ2021, #शिक्षणोत्सव या हॅशटॅगचा (#HASHTAG) वापर करावा.

सदर पोस्ट फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर करून झाल्यावर संबधित अधिकारी यांनी सदर पोस्ट ची लिंक कॉपी करून घ्यावी व
 खालील पोर्टल वरील फॉर्म मध्ये आवश्यक तपशील भरून आपल्या पोस्ट ची लिंक Submit  करावी

 
 शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या भेटीची नोंद राज्यस्तरीय प्रणालीवर करण्यात येईल.

  शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक देखील आपल्या शाळेतील शिक्षणोत्सवाचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करू शकतात.

            महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे लवकरात लवकर वाटप करण्यात यावे.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या स्तरावर जिल्हास्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या समवेत
बैठक घेण्यात यावी. 
उक्त बैठकीमध्ये सर्व शाळा नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्नित करण्यात याव्यात आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत घ्यावयाच्या काळजीबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात यावी. 
 सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचान्यांचे कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण प्रथम प्राधान्याने करून घ्यावे व ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नाही.
 त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे

 कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण केलेलं नाही या कारणास्तव कोणत्याही शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुपस्थित राहता येणार नाही. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के ठेवण्यात यावी.

 ज्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड १९ प्रतिबंधात्मक लस घेतलेली आहे अशा

शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना RIPCR चाचणी सक्तीची करू नये. 
 मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन हे
 दिनांक ०४ ऑक्टोंबर, २०२१ रोजी १२.०० नंतर "माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" या कार्यक्रमा अंतर्गत सर्व शाळा, मुख्याध्यापक व शिक्षक यांना संबोधित करणार आहेत.

 तरी उक्त कार्यक्रम सर्वांनी Youtube वरती पहावा व शक्य झाल्यास विद्यार्थ्यांना देखील सदर कार्यक्रम दाखविण्यात यावा. सदर कार्यक्रमाची लिंक सर्वांना समाजमाध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. 
 कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक कामकाजाकरीता शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

 शाळा सुरु झाल्या असल्यामुळे शिक्षकांना शाळेवरती रुजु होणकरीता कीविड-१९ च्या कामकाजामधून कार्यमुक्त करणेबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणेस कळवून उक्त शिक्षक शाळा स्तरावर लवकरात लवकर होतील याची दक्षता घ्यावी.

 कोविड १९ व्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पालकाबरोबर मुलांचही स्थलांतर झालेले आहे. सबब, शाळाबाह्य झालेल्या मुलांचा शोध घेऊन अशा मुलांना शाळेमध्ये प्रवेशीत करून घ्यावेत. एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही याकरीता गृहभेटी द्याव्यात.

 ग्रामीण भागातील इ. १ ली ते ४ थी व शहरी भागातील इ.१ ली ते ७ वी च्या शाळा सुरु होईपर्यंत उक्त वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण देवून आवश्यकतेनुसार विद्यार्थ्याच्या घरी भेटी देवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करावे.
 व्यवस्थापन समिती व पालक यांच्या बैठका आयोजित करून विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती
वाढविण्याचे प्रयत्न करावेत.

शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात यावा तसेच निर्जंतुकीकरण करण्यात व त्यासाठी
येणारा खर्च समग्र शिक्षा कार्यक्रमा अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीमधून करण्यात यावा.

 शालेय कामकाजाचे तास वाढविण्याकरीता स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा. 

 कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्याचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याकरीता विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापन करण्यात यावे.

 विभागीय शिक्षण उपलसंचालक यानी आपल्या स्तरावरून शाळा सुरु करण्याकरीता करण्यात आलेल्या पुर्वतयारीचा आढावा घेऊन
 दिनांक ०४/१०/२०२१ पासून सुरु होणाऱ्या शाळांची संख्या व त्यामधील पटसंख्या याची माहिती संकलीत करावी. तसेच दिनांक ०४/१०/२०२१ पासून दररोज प्रत्येक तारखेला सुरु असलेल्या शाळांची संख्या व त्यामधील उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या शिक्षकांची संख्या यांची जिल्हानिहाय माहिती संकलीत करुन एकत्रित अहवाल दररोज सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत सादर करण्याची दक्षता घ्यावी.

विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सुरु झालेल्या शाळा व शाळेमधील उपस्थित विद्यार्थी संख्या याची माहिती संकलीत करणे आणि शाळा स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी याचा दररोज आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याकरीता कार्यालयातील सहाय्यक संचालक यांचेवर जबाबदारी निश्चित करावी.

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक संचालक यांनी उक्त प्रमाणे काम

करुन प्राथमिक/माध्यमिक शिक्षण संचालनालय व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र, पुणे यांच्याशी समन्वय ठेऊन आवश्यक ते सर्व कामकाज पार पाडावेत,

वरीलप्रमाणे दिलेल्या सुचनांचे पालन करुन दिनांक ०४/१०/२०२१ पासून ग्रामीण भागातील इ. ५ वी ते शहरी भागातील इ. ८ वी ते १२ वी च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्याची कार्यवाही करण्यात यावी,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad