Class Five And Eight Scholarship Exam Interim Results Announce MSCE Pune

वर्ग 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 

2024 अंतरिम निकाल जाहीर ! 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 

शिष्यवृत्ती परीक्षा 2024 (Scholarship Exam) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल मंगळवार, दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. 

शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

विद्यार्थी निकाल 

विद्यार्थ्यांनी आपला Seat number (बैठक क्रमांक 11 अंकी) टाकावा आणि आपला निकाल पहा

खालील लिंक वर क्लिक करा

शाळा लॉगीन

खालील लिंक वर क्लिक करा

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दिनांक ३०/०४/२०२४ ते १०/०५/२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी 

दिनांक १०/०५/२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. 

विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी / ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com 

या ईमेलवर दिनांक १०/०५/२०२४ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.

विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे

उन्हाळी सुट्टीतील स्वाध्याय पुस्तिका 

अवांतर वाचनाची पुस्तके

What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad