UDISE PLUS STUDENT PROMOTION All Guide

यु-डायस प्लस विद्यार्थी प्रमोशन

संपूर्ण माहिती पहा ! आपल्या 

मोबाईलवरून विद्यार्थी प्रमोशन करा

यु-डायस प्लस विद्यार्थी माहिती सन 2022 - 2023 भरली आहे
मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरली आहे त्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोशन करायचे आहे
विद्यार्थी प्रमोशन करताना कोणते गोष्टी आवश्यक आहे या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत
विद्यार्थी प्रमोशन करताना संपूर्ण माहिती खालील प्रमाणे 

UDISE STUDENT PROMOTION | UDISE PLUS STUDENTS PROMOTION

Udise plus portal (SDMS) वर विद्यार्थी प्रमोशन खालील पद्धतीने करावे.

सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करावे

खालील लिंक वर क्लिक करा

_त्यानंतर Login page येईल. तिथे UDISE ची माहिती भरण्यासाठी वापरलेला ID PASSWORD टाकावा._

_Login झाल्यावर Academic year 2022 - 23 व Academic year 2023-24 असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी आपण Academic year 2023 - 24 ला क्लिक करावे._

_त्यानंतर डाव्या कोपऱ्यात जे पर्याय दिसतात त्यामध्ये शेवटी Progression Activity हा पर्याय आहे त्याला क्लिक करायचे आहे._

_त्याला क्लिक केल्यानंतर पुन्हा तिथे progression module, import module आणि Dropbox student list असे तीन पर्याय दिसतील._

_import module हा दुसऱ्या शाळेतून आपल्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट पाठवण्यासाठी वापरायचा आहे रिक्वेस्ट पाठवण्यासाठी विद्यार्थ्यांचा नॅशनल कोड लागणार आहे तो आपण तिथेच त्यावर क्लिक करून विद्यार्थ्यांचा आधार नंबर व जन्मतारीख टाकून मिळवू शकतो तो मिळाल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट संबंधित शाळेला पाठवू शकतो._

_*प्रमोशन करण्यासाठी आपल्याला progression module वर  Go जिथे लिहिलेले आहे त्यावर क्लिक करायचे आहे.*_

_त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची मागील वर्षाची इयत्ता व तुकडी निवडण्याचा पर्याय येईल._

_तो निवडून go वर क्लिक केल्यावर आपल्या त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची यादी ओपन होईल._

*_त्यानंतर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे. माहिती भरत असताना त्यामध्ये Progression status मध्ये Promoted हा पर्याय निवडायचा आहे. Marks मध्ये आपल्याला त्याचे मागील वर्षाचे गुण टक्केवारी मध्ये टाकायचे आहेत हे गुण पूर्णांकातच टाकायचे आहेत. त्यानंतर त्याचे मागील वर्षाचे उपस्थित दिवस व Schooling status मध्ये तो आपल्या शाळेत शिकत आहे की शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला आहे हा पर्याय निवडायचा आहे.Class and section to be promoted मध्ये आपल्याला त्याची तुकडी निवडायची आहे व हे सर्व झाल्यावर अपडेट वर क्लिक करायचे आहे._*

_अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला सर्व विद्यार्थी promote करायचे आहे त्यानंतर सर्व विद्यार्थी promote झाल्यानंतर शेवटी असलेल्या Finalize या टॅबवर क्लिक करून तिथे आपल्याला promote झालेली संख्या दिसेल ते बरोबर असल्यावर confirm यावर क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने आपला एक वर्ग promote झालेला असेल. याच पद्धतीने आपल्याला शाळेतील इतर वर्ग सुद्धा promote करायचे आहेत._

_वरील पद्धतीने आपण शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे udise portal वर Promotion अगदी सहज  करू शकता

विद्यार्थी प्रमोशन फार्म 

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad