SSC And HSC Exam Fee Refund Maharashtra Board

सन 2021 मध्ये इ. 10वी व इ. 12वी 

परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा मिळणार

SSC And HSC Maharashtra Exam Board

इ. 10वी व इ. 12वीच्या विद्यार्थी करिता आनंदाची बातमी परीक्षा फी परत मिळणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत सन २०२१ मधील इ. १० वी व इ. १२ वी च्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार (कोविड--१९ च्या प्रादुर्भावामूळे) रद्द करण्यात आली. तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार मंडळाने सन २०२१ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२वी) चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशत: करण्यात येत आहे.

दिनांक १२/११/२०२१ रोजी सकाळी ११.०० पासून नोंदणी सुरू

यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालळय यांनी विद्यार्थ्यांचा तपशील दिनांक १२/११/२०२१ रोजी सकाळी ११.०० पासून मंडळाचे १) इ. १० वी व १२ वी साठी खालील लिंक द्वारे नोंदविणे आवश्यक आहे.

परीक्षा मंडळाची अधिकृत वेबसाईट

https://www.mahahsscboard.in/

इयत्ता 10 वी करिता

इयत्ता १० वी माध्यमिक शाळांनी खालील लिंक द्वारे विद्यार्थ्यांचा तपशील नोंदविणे आवश्यक आहे.

         परीक्षा फी 

       SSC Login

इयत्ता 12 वी करिता

इयत्ता १२ वी माध्यमिक शाळांनी खालील लिंक द्वारे विद्यार्थ्यांचा तपशील नोंदविणे आवश्यक आहे.

          परीक्षा फी 

         HSS Login

सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी याबाबत नोंद घ्यावी

सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिध्दी देण्याची

व्यवस्था करावी, ही विनंती.

सचिव

राज्य मंडळ पुणे

शासन परिपत्रक डाऊनलोड करा

                  शासन परिपत्रक

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad