१०० दिवसांकरिता वाचन अभियान
आठवडा 6 सुरू
इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याकरिता जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ या कालावधीत १०० दिवसांकरिता वाचन अभियान (100 days Reading Campaign) राबविण्यात येणार आहे
आठवडा 6
वर्ग पहिली व दुसरी
शीर्षक वृक्ष
कथानक आणि पात्रे वाचल्यानंतर मुलांना कोणत्याही विशिष्ट कथेच्या पर्यायी शीर्षकांचा विचार करण्यास प्रोत्साहित करावे.
शिक्षक मुलांसोबत चर्चा करत फळ्यावर शीर्षक वृक्ष काढू शकतात.
शिक्षक मुलांसोबत चर्चा करत फळ्यावर शीर्षक वृक्ष काढू शकतात.
आठवडा 6
वर्ग तिसरी ते पाचवी
वाङ्मयीन दिनदर्शिका -
• विद्यार्थी विविध लेखक किंवा कवींच्या जन्मतारखा चिन्हांकित करून आणि त्यांच्या कलाकृतींची यादी करून वाङ्मयीन दिनदर्शिका तयार करतात
• या यादीतून ते वाचण्यासाठी कथा किंवा कविता
निवडतात.
निवडतात.
आठवडा 6
वर्ग सहावी ते आठवी
गाण्याचे किवा पाककृतीचे विश्लेषण
• शिक्षक ५-६ ( योग्यपद्धतीचे ) लोकगीत किंवा चित्रपटातील गाणे किवा स्थानिक पातळीवरील पाककृती ची निवड करतील.
• प्रत्येक विद्यार्थ्याने एक गाणे किंवा पाककृती निवडावी.
• प्रत्येक विद्यार्थ्यांला दिलेल्या वेळेत निवडलेल्या गाण्याचे साहित्याच्या अंगाने विश्लेषण करण्यास सांगावे त्यात संदर्भ, संदेश, भावना इत्यादींचा समावेश असू शकतो,जर ती पाककृती असेल, तर विद्यार्थ्याला पाककृतीचे विश्लेषण करण्यास सांगावे.

आपली प्रतिक्रिया व सूचना