NMMS Scholarship Examination Announce

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक NMMS

शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक १९ जून

२०२२ रोजी होणार


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ 
इ. ८ वी साठी परीक्षा

 दिनांक १९ जून २०२२ प्रसिध्दी निवेदनाबाबत

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर

Announce  Date NMMS Scholarship Examination

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी
रविवार दिनांक १९ जून २०२२ रोजी करण्यात येणार आहे

 त्यासंबंधी प्रसिध्दीपत्राची प्रत सोबत जोडलेली आहे.

महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन तसेच लोकराज्य मासिकामधून या परीक्षेच्या प्रसिध्दी निवेदनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी विनंती आहे

उद्दिष्ट

 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS ) २०२१-२२
सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्याथ्र्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी

 आर्थिक दुर्बलतेमुळे प्रशावान विद्यार्थ्याची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे..

इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.

१. अर्ज करण्याची पध्दत :

 दिनांक ०६/०४/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/


 या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील,

२. पात्रता :


(a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते..

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा तलाठ्यांचा सन २०२०-२९ च्या आर्थिक वर्षांचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा.

(c) विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (SC/ST या विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

d) खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.

• विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी,
• केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी
शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी,
सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

विद्यार्थ्यांची निवड:- 


विद्याथ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्याथ्यांची निवड करण्यात येईल.

Scholarship Exam 2022

Authority nameMaharashtra State Examination Council Pune
Exam nameNMMS ,8 th
FrequencyOnce a year
Class8 th class
Admit card modeOnline
Admit card dateRelease soon
Exam Dateदिनांक १९ जून
२०२२
Websitewww.mscepune.in
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad