Student Portal Students Category Information Updated

स्टुडंट पोर्टलवरील  विद्यार्थ्यांच्या

प्रवर्गाची माहिती अद्यावत

करणेबाबत

Student Portal Maharashtra


सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट Student Portal पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या माहितीत, ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवर्ग व जात विषयक माहिती मध्ये "not known" नोंदविलेले असेल किंवा माहितीच भरलेली नसेल अशा विद्यार्थ्यांच्या प्रवर्गाची( Category ) व जात ( Caste ) विषयक माहिती पूर्ण करावयाची आहे.

 तसेच ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अपूर्ण आहे, त्यांची आधारबाबतची माहिती देखील पूर्णपणे नोंदवावयाची आहे.
 सदरची कार्यवाही संबंधित सर्व शाळेंच्या मुख्याध्यापक यांच्या Student Portal Login स्टुडंट पोर्टलच्या लॉगीन वरून करावयाची असून दिनांक २०/०५/२०२२ पर्यंत पूर्ण करावयाची आहे.

तरी आपणास विनंती आहे की, आपल्या विभागातील अधिनस्त सर्व जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक / प्रशासन अधिकारी (न.पा./म.न.पा.) यांना कळवून त्यांचे कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या शाळेंशी संपर्क साधून प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती अद्यावत करून घ्यावी.

 सदर कामकाज महत्वाचे व कालमर्यादीत असल्याने सर्व नागरी तसेच ग्रामीण भागांमधील शाळेंची स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या वरील सर्व माहिती विहित मुदतीत कशी पूर्ण होईल असे पहावे.
असे परिपत्रक निर्गमित केले आहे

खालील लिंक वर क्लिक करा

          Student Portal

Step

  • Updated Student Tab वर क्लिक करून विद्यार्थ्यांची माहिती Update करा
  • यानंतर आपल्या विद्यार्थी यादी समोर दिसेल. Category आणि Caste या दोन कॉलम मधील माहितीचे निरीक्षण करा. ज्या विद्यार्थ्यांची माहिती तक्ता रिकामी दिसेल , अशा विद्यार्थी समोर असलेला Update टॅब वर क्लीक करून Category आणि Caste बाबत माहिती भरावी
  • प्रत्येक विद्यार्थी Caste माहिती Student Portal वर Update करावी

 तसेच सदर कार्यवाही पूर्ण झाल्याचा अहवाल कृपया
संचालनालयास सादर करावा.
सदर माहिती अद्यावती करणाबाबतीत संपूर्ण जबाबदारी आपली राहील याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती

Regarding updating information of students on Student Portal ...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad