Student Portal Useful Information Maharashtra

 Student Portal

 Useful Information 

Maharashtra

स्टुडंट पोर्टल ची सर्व माहिती


Student पोर्टल ला आधीचे सर्व शाळांचे पासवर्ड Reset झालेले आहेत
Default पासवर्ड 

   Guest123!@#  

ने लॉगिन करून नविन पासवर्ड बनवून पुढील काम करावे
Step
  • Login
  • शाळेचा यु डायस नंबर टाईप करा
  • वरील Default पासवर्ड Guest123!@#  टाइप करा
  • Enter captcha
  • Login वर क्लिक करा
  • आता नवीन Dashboard Open होईल
  • अजून Default पासवर्ड  Guest123!@#  टाईप करा
  • नवीन पासवर्ड तयार करा  उदा. Swami@123
  •  नवीन पासवर्ड Retype करा
  • Change पासवर्ड वर क्लिक करा
शाळेतील विद्यार्थी यांची माहिती आपल्याला स्टुडंट पोर्टल वर भरावी लागते, त्याकरिता आपल्याला स्टुडंट पोर्टल वरील सर्व Tab विषयी माहिती  आवश्यक आहे. चला तर मग आपण सर्व Tab विषयी माहिती जाणून घेऊ या.
सुरुवातीला आपण स्टुडंट पोर्टल वेबसाईटवर ओपन करू त्याकरिता खालील वेबसाईटवर क्लिक करा
आता शाळेचा UDISE NO व  पासवर्ड  टाकून लॉगिन करा
आता आपल्याला मेनू तील सर्व Tab दिसेल आता सर्व Tabविषयी माहिती पाहूया
Update
 स्टुडंट पोर्टल वरील पहिला Tab म्हणजे अपडेट याचा उपयोग म्हणजे आपल्याकडून विद्यार्थ्यांची माहिती अयोग्य भरल्या गेली असेल तर ते माहिती आपल्याला दुरुस्त करता येते.
त्याकरिता मेनू तील Student Entry वर जाऊन  Update टॅब वर क्लिक करा
आता आपण वर्ष व वर्ग निवडा
त्यानंतर विद्यार्थ्यांची यादी समोर दिसेल ज्या विद्यार्थ्यांची आपल्याला माहिती दुरुस्त करायची आहे त्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर अपडेट या बटन वर क्लिक करा
आता आपल्याला जी माहिती दुरुस्त करायचे आहे ते माहिती व्यवस्थितपणे भरा आणि Save करा

दाखल खारीज क्रमांक दुरुस्ती

 जर विद्यार्थ्यांचे दाखल खारीज क्रमांक दुरुस्ती करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांची दाखल खारीज क्रमांक दुरुस्ती  असेल तर आपल्या रजिस्टर क्रमांक नसलेला पहिल्यांदा तो नंबर टाकावे व सेव करावे त्यानंतर तोच विद्यार्थी विद्यार्थ्याला जो दाखला क्रमांक आहे तोल क्रमांक टाकून Save करावे
तसेच सर्व माहिती दुरुस्त करता येते परंतु  वर्गात बदल करता येणार नाही, विद्यार्थ्यांचा वर्ग कशाप्रकारे बदल करावे याविषयी आपल्याला पुढील Tab वर माहिती  मिळणार आहे
आपल्याला आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करणे आवश्यक आहे कारण पुढील शिक्षणाकरिता माहिती अपडेट पाहिजे तसेच वर्ग दहावी करिता परीक्षा मंडळ यांच्याकडून  सूचना मुख्याध्यापकांना मिळते तेव्हा आपल्याला ही समस्या येणार नाही त्यापूर्वीच आपण पण आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती अपडेट ठेवावे

Promotion

आपल्याला दर वर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या शाळेतील सर्व वर्गनिहाय विद्यार्थ्यांचे पुढील वर्गात प्रमोशन करावे लागतील.
त्याकरिता मेनू तील Promotion टॅब वर क्लिक करा
आता आपल्याला सर्व वर्गाचे विद्यार्थी संख्या दिसेल या विद्यार्थी संख्येवर क्लिक करा आणि प्रत्येक वेळेस 5  विद्यार्थी निवडा आणि खालील दिलेल्या टॅब क्लिक करा अशाप्रकारे सर्व विद्यार्थी पुढील वर्गात प्रमोशन करा
वर्ग नववी व दहावीचे 5 विद्यार्थी निवड करुन गुण भरून Promotion करावे
तसेच मागील काही Pending असल्यास पूर्ण करा त्याशिवाय आपल्याला वरील सुविधा उपलब्ध होणार नाही
म्हणून सर्व वर्षाचे विद्यार्थी प्रमोशन करा

Attach

Attach मेनू तील पहिला Tab आहे Attach Request 


Attach Request म्हणजे आपल्या शाळेत जो विद्यार्थी आला आहे


जर त्या शाळेच्या शेवटच्या वर्गातून आला असेल Attach Request करावे


त्याकरिता Search By  निवडा व यापूर्वीची शाळेचा यु डायस नंबर टाका 

वर्ग निवडा व Find करा , आपल्याला विद्यार्थ्यांची यादी दिसेल यादीतून आपला विद्यार्थी सिलेक्ट करा व Send Request वर क्लिक करा

Attach Approval

Attach मेनू तील दुसरा Tab आहे
Attach Approval
आपल्या शाळेतील शेवटच्या वर्गाचे विद्यार्थी Promotion केल्यावर ड्रॉप बॉक्स वर Save होतात, जर त्या विद्यार्थ्यांची Attach Request आपल्याला आली असेल तर 
Attach Approval तून  Approval करावे , आता आपल्या ड्रॉप बॉक्स तून विद्यार्थी कमी होईल. आता ड्रॉप बॉक्स स्थिती Pending राहणार नाही.

Transfer

Transfer मेनू तील पहिला Tab Transfer Request
आपल्या शाळेत दुसऱ्या शाळेतून आलेल्या विद्यार्थी करिता ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवावे लागतील त्याशिवाय ते विद्यार्थी आपल्या Login ला येणार नाही, Transfer Request वर क्लिक करून Search By करा व ज्या शाळेतून विद्यार्थी आलेला असेल त्या शाळेचा यु डायस नंबर टाकून वर्ग निवडा व Find करा , आता आपल्याला विद्यार्थ्यांची यादी दिसेल या यादीतून आपला विद्यार्थी निवडा
आता त्या विद्यार्थ्यांची आपल्या शाळेचा दाखल खारीज नंबर व दाखल केल्याचा दिनांक टाकून Send Request वर क्लिक करा.
Transfer Approval
Transfer मेनू तील दुसरा Tab Transfer Approval 
जे विद्यार्थी आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत दाखल झाले असेल तर त्याची ट्रान्सफर रिक्वेस्ट आली असेल तर Transfer Approval वर क्लिक करा आता आपल्याला विद्यार्थ्यांची यादी दिसेल ती यादी तपासून Transfer Approval करा
Transfer (out of school) Request
Transfer मेनू तील तिसरा Tab
आहे, Tab उपयोग म्हणजे जे जर एखादा विद्यार्थी आपल्या शाळेत आलेला असेल आणि यापूर्वीची शाळेने त्या विद्यार्थ्याला out of school केले असेल पाठवावे तर Transfer (out of school) Request पाठवावे.
वर्ग बदल करणे
दुसरा  उपयोग म्हणजे आपल्या शाळेत आलेले विद्यार्थीचा वर्ग बदल करायचे असेल तर याचा उपयोग करावे. प्रथम त्या विद्यार्थ्याला out of school करावे. 
त्यानंतर Transfer (out of school) Request पाठविताना आपल्या शाळेचा यु डायस नंबर टाकून आपल्या शाळेलाच रिक्वेस्ट पाठविताना. 
विद्यार्थी ला ज्या वर्गात घ्यायचे असेल तर तो वर्ग निवडा. आपल्याला शाळेचा दाखल खारीज क्र. शाळेत दाखल तारीख टाका
आता Transfer (out of school) Approval वर क्लिक करा, आता विद्यार्थी ची यादी दिसेल, यादीतून तो विद्यार्थी निवडा व Approval करावे 
आता त्या विद्यार्थी चा वर्गात बदल होईल.
Transfer (out of school) Approval
Transfer मेनू तील चौथा Tab आता Transfer (out of school) Request आली असेल तर विद्यार्थी तपासून Approval करावे.

Excel

आजपासून नवीन परिपत्रकानुसार  31 डिसेंबर 2014 पर्यंत जन्मतारीख असलेल्या विद्यार्थ्यांची Student portal वर Entry होत आहे.

वर्ग पहिली च्या विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याकरिता Download Personal वर क्लिक करून Excel Sheet डाऊनलोड करा.
वर्ग पहिली विद्यार्थी माहिती ऑनलाईन करण्याकरिता सविस्तर माहिती करिता खालील Link वर क्लिक करा
वर्ग पहिली विद्यार्थी ची माहिती पूर्ण भरावे.

Upload Personal

Menu वर क्लिक करून Upload Personal वर क्लिक करा आता CVS फॉर्मेट यातील Excel Sheet Upload करा

  • Upload स्टेप 1 वर क्लिक करावे
  • Upload स्टेप 2 वर क्लिक करावे


त्यानंतर विद्यार्थी यादी  येईल . Status Accepted असा मेसेज डिस्प्ले वर दिसेल

जो Error येत असेल तो पूर्ण करावे

अशाप्रकारे वर्ग पहिली चे विद्यार्थी ची  माहिती ऑनलाईन भरावे

New Entry Tab

ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पोर्टल वर नोंद नसेल त्यांनी आपल्या तालुक्याचे  माननीय गट शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून BEO Login वरुन New Tab घेऊन विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरावी
जर एखादा विद्यार्थी इतर राज्यातून आपल्या शाळेत प्रवेश घेतले असेल त्यांच्या करिता सुद्धा New Entry Tab  घ्यावे

 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad