SSC And HSC Board Exam Schedule Announced

इ. दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी 

परीक्षा २०२३ चे वेळापत्रक जाहीर

दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा
फेब्रुवारी-मार्च २०२३ चे वेळापत्रक जाहीर 
आता परीक्षेची तयारी करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे मार्फत होणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ. 10 वी) फेब्रुवारी - मार्च 2023 लेखी परीक्षा संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. 12 वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ. 10 वी ) फेब्रुवारी-मार्च 2023 लेखी परीक्षा खालील संभाव्य कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

SSC Board Exam Maharashtra

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी ) फेब्रुवारी-मार्च 2023 लेखी परीक्षा
गुरुवार दिनांक 02 मार्च 2023 हे शनिवार दिनांक 25 मार्च 2023

HSC Board Exam Maharashtra

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी ) फेब्रुवारी मार्च 2023 लेखी परीक्षा
- मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ते सोमवा
दिनांक 20 मार्च 2013
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी ) फेब्रुवारी मार्च 2023 लेखी परीक्षा
- मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ते सोमवार दिनांक 20 मार्च 2013
दहावी वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

बारावी (General and Bifocal Courses ) वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

बारावी ( Vocational ) वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृतपणे

 संकेतस्थळावर दि. १९.०९.२०२२ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल.

सदर वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. तद्नंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही..

उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad