Good News Income Tax Seven Lakhs No Tax

Budget 2023 - 2024 !

Income Tax नवीन स्लॅब 

आता 7 लाख उत्पन्नावर 

Tax भरावा लागणार नाही


बजेट 2023 Budget 2023

Budget 2023: आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी 2023 - 2024 साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली आहे

नोकरदारांना अखेर मिळाला मोठा दिलासा; 

७ लाखापर्यंत आयकर नाही


आता एकुण ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त करण्यात आले आहे 
मागील करपात्र उत्पन्न हे पाच लाख पर्यंत होते
प्राप्तिकरामध्ये मिळणाऱ्या रिबेटची मर्यादा यापूर्वीच्या 5 लाख रुपयांवरून
7 लाख रुपयांवर नेण्यात आली आहे.


कर्मचाऱ्या साठी  आनंदाची बातमी

Income Tax In Budget 2023

नवीन टॅक्स प्रणाली

For : 2023-24 

आज संसदेत सादर करण्यात आलेले बजेट मधील प्रमुख बाबी....

 ज्या व्यक्ती चे वेतन उत्पन्न 7 लाख पेक्षा कमी असेल त्यांना 0 टॅक्स असेल.

 ज्या व्यक्ती चे वेतन उत्पन्न 7 लाख पेक्षा जास्त  असेल त्यांना खालील प्रमाणे

7 लाख  उत्पन्नावर 0 टॅक्स

नवीन Income Tax स्लॅब

1) 0 ते 3 लक्ष पर्यंत  0% टॅक्स.

2) 3 लक्ष ते 6 लक्ष पर्यंत   5 % टॅक्स

3) 6 लक्ष ते 9 लक्ष पर्यंत  10% टॅक्स

4) 9 लक्ष ते 12 लक्ष पर्यंत  15%  टॅक्स.

5)12 लक्ष ते 15 लक्ष पर्यंत  20%  टॅक्स.

6) 15 लक्ष पासून पुढे  30% टॅक्स.

तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार?


एकूण उत्पन्न (रुपये).             किती टॅक्स

7 लाख                                   0 रुपये

8 लाख                                  35 हजार

9 लाख                                  45 हजार

10 लाख                                60 हजार

12 लाख                               90 हजार

15 लाख                            1 लाख 50 हजार


याचाच अर्थ 

जसे पूर्वी 5 लाख रु करपात्र उत्पन्नासाठी 0 टॅक्स होता, म्हणजेच यात

2.5 ते 5 लाख रु- 12500₹ टॅक्स होता, ज्यास हा 87 A नुसार 12500रु रिबीट मिळत असे व इनकम टॅक्स 0 व्हायचा..

(आता 3 लाख रु ते 6 लाख रु)
3 लाख × 5% = 15000 रु
+
6 लाख - 7 लाख रु = 1 लाख रु × 10% = 10,000 रु टॅक्स

7 लाख रु पर्यंत एकूण टॅक्स = 25,000 रु असेल
 व त्यास एकूण टॅक्स रिबीट 25000 रु असेल 
तेव्हाच इनकम टॅक्स 0 रु होईल..

तथापि जर करपात्र उत्पन्न ( सर्व वजावटी जाऊनही) 7 लाख रु च्या वर शिल्लक राहिल्यास 

हा 25,000 रु टॅक्स रिबीट मिळणार नाही.. असाच याचा अर्थ आहे...

5,00,000 पर्यंत एकूण उत्पन्न असलेली रहिवासी व्यक्ती जुन्या आणि नवीन अशा दोन्ही नियमांनुसार सवलतीमुळे कोणताही कर भरत नाही. 
 रहिवासी व्यक्तीचे एकूण उत्पन्न 7,00,000 पर्यंत असल्यास ते कर भरणार नाहीत म्हणून नवीन नियमांतर्गत रहिवासी व्यक्तीसाठी सवलत वाढविण्याचा प्रस्ताव आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad