Intra District Teacher Transfer New Information

जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या 

सन २०२२-२३ जिल्हांतर्गत 

बदल्यांबाबत सविस्तर वाचा

या विभागाच्या दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हांतर्गत बदल्या ह्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने करण्याची कार्यवाही सद्यस्थितीत सुरु आहे.

Eligible - Round 2

 सद्यस्थितीत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याची कार्यवाही शासन पत्र दिनांक २०.१२.२०२२ व दिनांक १३.०१.२०२३ रोजीच्या वेळापत्रकानुसार सुरु असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्र. १, २, ३, ४ व ५ मधील कार्यवाही पुर्ण झालेली आहे.


२. “शासन निर्णय दिनांक ०७.०४.२०२१ मधील मुददा क्र. ४.३.४ नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांच्या बदल्या करताना पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा ३० कि.मी. परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल.

 जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रिकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे.

 यापैकी एकाची पण दहा वर्षे सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल” असे नमूद आहे. तथापि, म.ना.से (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१, नियम ९ (५६) मधील विहीत "बदली व्याख्येस अनुसरुन ज्या पती पत्नींची टप्पा क्र.५ मध्ये One Unit मधून बदली झालेली आहे, तथापि, त्यापैकी एकाच्या शाळेमध्ये बदल झालेला नाही (त्याच शाळेतील अन्य रिक्त / बदलीपात्र पदावर बदली झालेली आहे) अशा शिक्षकांचा त्या शाळेवरील वास्तव सेवा ज्येष्ठतेचा दिनांक हा त्या शाळेवरील प्रथमतः रुजू झाल्याचा दिनांकच ग्राह्य धरण्यात यावा.

 तथापि, अशा शिक्षकांना सन २०२२-२३ च्या बदली प्रक्रियेमधील टप्पा क्र.५ च्या पुढील बदली प्रक्रियेमधून वगळण्यात यावे.

३. Vinsys IT Services (I) Pvt. Ltd, यांनी बदली प्रणालीमध्ये टप्पा क्र. ५ राबविताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे सदर तांत्रिक बाबींवर कार्यवाही करुन दि.०८.०२.२०२३ रोजी बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्यांची अंतिम यादी प्रसिध्द केली आहे. 

सदर यादी पीडीफ स्वरुपात डाऊनलोड करुन ती यादी तसेच बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्यानंतर जिल्हा स्तरावरील रिक्त जागांची यादी व टप्पा क्र. ६ करिता पात्र विस्थापित शिक्षकांची यादी आजच प्रसिध्द करण्यात यावी, ही विनंती, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे 

@@@@@@@@@@


बदली अपडेट..!

दिनांक ०९/०२/२०२३ वेळ:- ११.२० मी


बदली पात्र शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त


Eligible Round 2/विस्थापित संदर्भात महत्वपूर्ण.


पती-पत्नी शिक्षकांना पुन्हा वन युनिट ची संधी.*(जर बदली पात्र फेरीत पसंतिक्रम न मिळाल्यास/विस्थापित झालेले असल्यास)


बदली पात्र/संवर्ग-४ ची पहिली फेरी पूर्ण झाली आहे.बदली पात्र शिक्षकांच्या बदली संदर्भात सुधारित यादी आज प्रकाशित होणे अपेक्षित आहे.

यादी प्राप्त झाल्यावर जर Status मध्ये आपल्या नावासमोर खालील Term दिसत असतील तर आपणास (Eligible Round 2) मध्ये फॉर्म भरणे गरजेचे असणार आहे.खालील status असलेल्या शिक्षकांनी फॉर्म न भरल्यास System उपलब्ध असलेल्या जागेवर आपणास बदली देऊन टाकेल.

१)Tagged

२)Eligible

३)Not Transffered


टीप:- ही विस्थापित शिक्षकांची फेरी पूर्ण झाल्यावर जर अवघड क्षेत्रातील जागा शिल्लक राहत असल्यास सुगम क्षेत्रात १० वर्ष सेवा पूर्ण झालेले परंतु सदरील शाळेवर ५ वर्ष सेवा पूर्ण न झालेले शिक्षक यांची सेवा जेष्ठते प्रमाणे यादी लावली जाणार आहे व त्यांना तिथे पदस्थपणा दिली जाणार आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad