SSC HSC Board Exam Big Update For Questions Paper

दहावी-बारावी 2023 परीक्षेबाबत मोठा निर्णय!

प्रश्नपत्रिकेबाबत मोठा बदल

SSC HSC Board Exam Maharashtra

प्रश्नपत्रिका वितरीत

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरीत करणेची कार्यपध्दती बंद करण्याबाबत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळापूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.

परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत. 

दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिका १० मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्या नंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला पेपर सुरु होण्यापूर्वीच केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असणार आहे


बारकाईने लक्ष

इ. १० वी व इ. १२ वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षाकडे बारकाईने लक्ष असते. पेपरफुटीच्या अशा अफवांमुळे परीक्षायांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. तसेच यामुळे मंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन होते.

 यापूर्वी परीक्षा दालनात परीक्षार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वितरण केल्यामुळे परीक्षा केंद्रावर निर्धारीत वेळेनंतर पोहोचणा-या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा आशय आढळून आल्याच्या घटना निदर्शनास आलेल्या आहेत.

अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात येत आहे.

सर्व परीक्षायांनी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. 

तसेच परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातही (Hall Ticket) नमूद करण्यात आले आहे.

 सकाळ सत्रात स. १०.३० वाजता तसेच दुपार सत्रात दु. २.३० वाजता परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्याने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून सकाळ सत्रात स. ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.

परीक्षा दालनात ज्या कमाने परीक्षाथ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप होईल, त्याच कमाने परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर लिखित उत्तरपत्रिका परीक्षार्थ्यांकडून गोळा करण्याच्या सूचना सर्व दालन पर्यवेक्षकांना संबंधित परिरक्षक व केंद्रसंचालक यांचेमार्फत देण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या बाबी

◆ प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे वेळेत लिहण्याचा असावा सराव

◆ पेपर सुरु होण्यापूर्वी किमान अर्धा तास परीक्षा केंद्रावर पोचा

◆ संपूर्ण तयारीनिशी परीक्षेला सामोरे जा; कशाचाही मनावर नसावा तणाव

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad