Good News For Student Summer Vacation

Top Post Ad

विद्यार्थ्याकरिता आनंदाची बातमी! 

दिनांक २१ एप्रिल पासून उन्हाळी

सुट्टी जाहीर! शिक्षणमंत्री

सध्या संपूर्ण राज्यात तापमानात वाढ झाली आहेे त्यामुळे शासनाने खालील निर्णय जाहीर केले आहे

राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याची तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च

माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करणे तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करणेबाबत

 त्यानुसार याअनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २१.०४.२०२३ पासून सुटी जाही करण्यात येत आहे.

२) राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.

३. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने विदर्भ वगळता सर्व विभागातील शाळ दरवर्षी दिनांक १५ जून रोजी व त्या दिवशी सुटी असल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील व विद विभागातील शाळा दरवर्षी दिनांक ३० जून रोजी व त्यादिवशी सुटी आल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०४२०२००३३८८४२१ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.