Sarvasadharan Badali New Update Circular Published

सन २०२३-२४ सर्वसाधारण बदल्या 

करण्यास मुदतवाढ ! शासन 

परिपत्रक जाहीर


सन २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षातील सर्वसाधारण बदल्या करण्यास मुदतवाढ देणेबाबत

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय :-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतूदीनुसार राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात.


 तथापि, सन २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षातील दिनांक ३१ मे, २०२३ पर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या या 
दिनांक ३० जून, २०२३ पर्यंत करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०५३०१६५०४३४२०७ असा आहे. 
हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
 महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad