केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा
परीक्षा 2023 पुढे ढकलली !
आयुक्त राज्य परीक्षा परिषद, पुणे
प्रसिध्दीपत्रक
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - 2023 या परीक्षेच्या आयोजनाबाबत.या कार्यालयाची अधिसूचना जा.क्र.मरापप/ बापवि / 2023/3504, दिनांक 05/06/2023 अन्वये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा- 2023 या परीक्षेचे आयोजन माहे जून 2023 च्या आठवडयामध्ये करण्यात आले होते.
परंतू मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे शासन पत्र संकिर्ण 2022/प्र.क्र.81/ टीएनटी-01, दि. 20 जून 2023 अन्वये मान्यता मिळाल्यानुसार प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येते आहे.
परीक्षेचा पुढील कालावधी यथावकाश परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
(शैलजा दराडे)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- 01
ठिकाण: पुणे
दिनांक: 21/06/2023


आपली प्रतिक्रिया व सूचना