विद्यार्थी व पालकांसाठी मोठी
बातमी!- इयत्ता 10 वीच्या पुरवणी
परीक्षेसाठी 'या' तारखेपर्यंत करता
येणार अर्ज ! वाचा सविस्तर
तुम्हाला माहिती असेल, इयत्ता दहावीचा निकाल दिनांक 2 जुन 2023 रोजी जाहीर झाला असून, येत्या जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी -
दिनांक 16 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत असणार आहे, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी म्हटले आहे.
कुठं करता येईल अर्ज
▪️ 10वी च्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी www.mahasscboard.in
या संकेतस्थळावर अर्ज भरावयाची आहेत. नियमित शुल्कासह दिनांक 16 जून 2023 पर्यंत, तर विलंब शुल्कासह दिनांक 21 जून 2023 पर्यंत अर्ज सादर करता येईल.
▪️ त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असंही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हटले आहे.
▪️ बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा दिनांक 18 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान होईल तर बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दिनांक 18 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
इयत्ता 10वीच्या पुरवणी परीक्षेसाठी दिनांक 16 जूनपर्यंत अर्ज करता येईल* - हि बातमी आपण 10वीच्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा
नवीन नवीन अपडेट करिता What's Up Group Join करा


आपली प्रतिक्रिया व सूचना