Ads Area

Cluster Head Online Examination All Information

केंद्र प्रमुख ऑनलाइन परीक्षा करिता 

सूचना ! संपूर्ण मार्गदर्शन 

पुढील पानांवर दिलेल्या सूचनांची प्रिंट काढा व काळजीपूर्वक वाचा.

सूचना

1. बदर परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षेच्या स्थळात (Site) प्रवेश करण्यासाठी आपणास दिलेला यूजर आई डी/ पासवर्ड नमूद करावा लागेल. संगणकाच्या पडद्यावर दिसणारे तुमचे नांव आणि इतर तपशील बरोबर आहे याची पडताळणी करावी. आपणास उपलब्ध करुन देण्यात आलेला यूजर आई डी / पासवर्ड बाबत गुप्तता पाळणे आवश्यक आहे.

2. कृपया आपल्या सोबत नवीनतम फोटो चिकटवलेले हे प्रवेशपत्र आणि सद्य स्थितीत वैध असे मूळ स्वरूपातील ओळखपत्र आणावे प्रवेरापत्रावर असणारे नाथ (ऑनलाईन नोंदणीच्यावेळी जे उमेदवाराने दिलेले असेल) व ओळखपत्रावरील नमूद असलेल्या नावाशी तंतोतंत जुळावयास हमे. विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचे पहिले/मथले/अंतिम नाव बदलले आहे त्यांनी हयाची खास दखल घ्यावी जर प्रवेश पत्रावरील फोटो/नाव आणि ओळखपत्रावरील फोटोत/नावात कोणताही फरक असेल तर अशा उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल, अशा उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना/विवाह प्रमाणपत्र/शपथपत्र उपस्थित केले तरच त्यांना परीक्षेस बसाम्यास अनुमती देण्यात येईल

3. बायोमेट्रिक हाटा (अंगठाराचा ठसा) आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतला जाईल. बायोमेट्रिक डाटा च्या सत्यता पडताळणीचा अंतिम निर्णय (जुळतो अत्यता जुळत नाही) MSCE चा असेल व उमेदवारांना बंधनकारक असेल, बायोमैट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास/सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घ्या:

(क) जर बोटांवर कसलाही घर असेल (शाई/मेहंदी/रंग इत्यादी) तर धुवून टाका आणि परिक्षेच्या दिवसाआधी तो घर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या,

(ख) जर बोटांना मळ किया धूळ आगली असेल तर बोटांचे ठसे (Finger prints) घेण्याआधी धुवून घ्या आणि हातांची बोटं सुकली आहेत याची खात्री करून घ्या.

(ग) दोन्ही हातांची बोट सुकलेली आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पुसा.

(घ) ठसा घेतल्या जाणा-या अंगठयाला जर जखम/मार लागला असेल तर त्वरित परिक्षा केंद्रावर संबंधित अधिका-पास कळवा.

(या मुद्द्यांचे पालन करण्यास उमेदवार असमर्थ ठरल्यास परिक्षेस बसु दिले जाणार नाही)

परीक्षेच्या स्वरुपाबद्दल माहिती सूचना देणारी पुस्तिका (Information Handout) MSCE च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर माहिती पुस्तिका संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन त्याचे अध्ययन करावे.

5. पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत उमेदवारांनी प्रवेशपत्रावर विहित ठिकाणी त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा स्पष्टपणे उमटवावा व स्वाक्षरी करावी.

6. उमेदवाराने सोबत बॉल पॉइट पेन आणावयाचे आहे. उमेदवार आपल्यासोचत स्वतःचे स्टैंप पेंड आणू शकतात. कच्चे काम करण्यासाठी कागद पुरवला जाईल परीक्षा संपल्यावर कच्चे काम केलेले कागद प्रवेश पत्रासह पर्यवेक्षकाकडे जमा करावे लागतील.

7. तुम्हाला कर नमूद केलेल्या ऑनलाईन परिक्षेस बसण्यासाठी तुमचे वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव इ. ची सत्यता न तपासता अनुमति देण्यात आली आहे. परीक्षेला बसण्यापूर्वी MSCE ची सर्व पात्रता व निकष पूर्ण करतो हे पडताळून बघण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची राहील.

8. बरोबर आणि चुकीच्या उत्तरांमधील सारखेपणाचे आकृतीबंध उपडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादांचे (उत्तरांचे) अन्य उमेदवारांच्या प्रतिसादांबरोबर विश्लेषण केले जाईल. ह्या संदर्भात वापरलेल्या विश्लेषणात्मक पध्दतीमध्ये जर का असे अनुमान निघाले/आढळून आले की, प्रतिसादांचे आदान प्रदान इझालेले आहे अणि मिळवलेले गुण है यधार्थ/स्विकारण्यायोग्य नाहींत, तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

9. हया प्रवेशपत्रावर छापलेल्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर उमेदवारास परीक्षास्थानी घावयास हवे. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बसू दिले जाणार नाही.

10. पुस्तके, वह्या परिगणक यंत्र (Calculator). पेजर, मोबाईल फोन इत्पादी प्रकारची साधने/साहित्य परीक्षा केंद्राच्या परीसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास. स्वतःजवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. सदर नमूद केलेली अनधिकृत साधन/साहित्य परीक्षेच्यावेळी संबंधित परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल. अशा साधन/साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, पाची नोंद घ्यावी,

11. परीक्षेचा दिनांक/ सत्र / परीक्षा स्थान यामधील कोणत्याही बदलाच्या विनंतीची दखल घेतली जाणार नाही.

12. सदर प्रवेशपत्र म्हणजे MSCE द्वारे प्रवेशाची हमी नव्हे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी

13. उमेदवाराच्या निवडी संदर्भात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय दबाव अशामुळे उमेदवारास अपात्र समजले जाईल.

14. कृपया नोंद घ्यावी की कोणताही उमेदवार परीक्षेसाठी एकाच वेळी उपस्थित राहू शकतो/ते. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास उमेदवारांना प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या दिवशी व वेळी एकदाच परीक्षेस उपस्थित राहण्याचा सल्ला दिला जातो, उर्वरीत सर्व प्रवेशपत्रे उमेदवारांना परत करावी लागतील.

15. परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये ऐनवेळीस काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही. अशा प्रसंगी असा व्यत्यय सुधारण्याचा पूर्णतः प्रयत्न केला जाईल, ज्यामध्ये उमेदवारांना एका जागेहून दुसऱ्या जागेस हलविणे किंवा परीक्षेस विलंब होणे गृहित आहे. पुन्हा परीक्षा घेणे याबाबतचा निर्णय हा परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा/मंडळाचा अंतिम राहील. उमेदवार पुन्हा परीक्षेसाठी कोणताही दावा करणार नाही. या विलंबीत झालेल्या प्रक्रियेस उमेदवार एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलण्यास तयार नसेल किंवा परीक्षा प्रक्रियेत भाग घेण्यास तयार नसेल अशा उमेदवारांना प्रक्रियेमधुन संपूर्णपणे वगळण्यात येईल.

16. परीक्षेची सामग्री तथा त्याबद्दलची कोणतीही अन्य माहिती, संपूर्ण किंवा भागामध्ये उघड करणे, प्रकाशित करणणे, पुन्हा निर्माण करणे, ट्रांसमिट करणे, जमा करणे किंवा प्रसारण आणि जमा करणारे किंवा परिक्षा केंद्रामध्ये दिला जाणारा कागद घेऊन जाणारे, किंवा परीक्षेच्या सामग्रीचा बेकायदेशीर बाळगण्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल

17. अपंग वाक्तिनी (PwBD) त्याच्या व्यवस्थेविषयीच्या माहितीसाठी परिक्षेच्या 30 मिनिटे आधी चाचणी केंद्र प्रशासकांशी संपर्क साधावा.

18. आपणास सदर परीक्षेस स्वःखचर्चाने यावे लागेल आणि कोणताही प्रवास खर्च भत्ता दिला जाणार नाही.

19. उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यानी "The Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024" ची नोंद घ्यावी

              आपणांस शुभेच्छा 

मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा 


What's Up Group Join 

➤ What's Up Group Join 

What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad