शाळाबाह्य, अनियमित व
स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या
प्रवाहात दाखल करणार
शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक १७ ऑगस्ट, २०२३ ते ३१ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, राज्यामध्ये विविध कारणांमुळे बालके शाळाबाह्य होत असतात. तसेच विविध प्रकारच्या कामानिमित्त कामगारांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होत असते. तरी या शाळाबाह्य होणाऱ्या व स्थलांतरीत होणाऱ्या कामगारांच्या बालकांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक- १७ ऑगस्ट, २०२३ ते ३१ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्याचे ठरविले असून त्याबाबतची SOP व माहिती संकलनाचे formats तयार केली आहे. SOP ची प्रत व माहिती संकलनाचे formats सुलभ सदर्भासाठी सोबत जोडली आहे.
सदरचे महत्वपूर्ण सामाजिक काम हे केवळ शासनाच्या एकाच विभागाकडून पूर्णत्वास नेणे केवळ अशक्यप्राय बाब असल्याने यात संबंधित सर्व विभागांचा सहभागही तेवढाच महत्वाचा असल्याने सर्व विभागांनी एकजूटीने काम करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने महसूल, ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महिला व बालविकास विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, साखर आयुक्तालय, कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्यांक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागांचा सहभाग आवश्यक आहे.
तरी यासाठी आपणास विनंती करण्यात येते की, आपल्या स्तरावरून शासनाच्या अशा संबंधित विविध विभागांच्या मंत्रालयीन विभागांना सदर सर्वेक्षणामध्ये सर्व ग्रामिण तसेच नागरी स्तरांवर शिक्षण विभागास सहकार्य करण्याबाबत कळविण्यात यावे. त्यामुळे सदर सर्वेक्षणाचे काम अर्थपूर्ण व फलदायी होईल...


आपली प्रतिक्रिया व सूचना