Baseline Test Mark Teachers On Chatbots Registration Training

पायाभूत चाचणीचे गुण PAT 

(महाराष्ट्र) या चॅटबॉटवर शिक्षकांनी

नोंदविणे बाबत प्रशिक्षण

      वरील विषयान्वये STARS प्रकlल्पामधील SIG - 2 Iimproved Learning Assessment System  नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत  पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन  करण्यात येत  आहे.

राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९  ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते.  

   विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चॅटबॉट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे*. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या *व्हिडीओची यु-ट्यूब लिंक  सोबत देण्यात येत आहे*. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे *दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२:०० ते ०१:३० या कालावधीत यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल*

.संबधित  शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण  यु-ट्युबद्वारे घेण्याबाबत कळविण्यात  यावे.  प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी  *पायाभूत चाचणीचे गुण दि. १४ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे*.

जिल्हा शिक्षणाधिकारी(प्राथमिक)यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी द्यावी .सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चॅटबॉटवर  पायाभूत चाचणीचे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे, अशा इयत्ता तिसरी ते आठवी शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चॅटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक मदतीसाठी श्री. वेंकटेश अनंतरामन ८०००४९४७६४ यांचेशी संपर्क करण्यात यावा.

  तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.


यु-ट्यूब लिंक 

PAT चॅटबॉट मार्गदर्शिका: 

https://bit.ly/PATManual 


      अमोल येडगे,(भा.प्र.से)

               संचालक

   राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,     पुणे

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad