Class Five And Eight Annual Examination Re Examination Evaluationl

राज्यातील इयत्ता पाचवी व आठवी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणेबाबत ! SCERT PUNE 

 राज्यातील इयत्ता 5वी व 8 वी परीक्षा बाबत दिनांक 29 फेब्रुवारी 2024 शासन परिपत्रक निर्गमित 

शासन निर्णय दि. ०७ डिसेंबर २०२३रा नुसार अंमलबजावणी करणेबाबत ...

संदर्भ :-१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९


उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम २०२३ (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता ५ वी व ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन पद्धती २०२३-२४ पासून लागू करणेबाबत संदर्भ क्र. ७ नुसार निश्चित करणेत आलेली आहे.

 सदर शासन निर्णयानुसार अंमलबजावणी संदर्भात नियोजन करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने संदर्भ क्र. ७ मध्ये नमूद केल्यानुसार राज्य नियंत्रण समिती गठीत करणेत आलेली आहे. 

संदर्भ क्रमांक ८ अन्वये आपणास सनियंत्रण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त मधील सूचना व संदर्भ क्र.७ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाहीची अंमलबजावणी

करणेबाबत कळविण्यात आले होते. 

संदर्भ क्रमांक ८ अन्वये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांना इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून पुरविण्यात येतील असेही कळविण्यात आले होते. 

तथापि संदर्भ क्र. ७ व ९ अन्वये शासन निर्णयानुसार सदर प्रश्नपत्रिका ह्या शाळास्तरावर तयार करणेत याव्यात असे नमूद केलेले असल्याने इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करणेबाबत आपल्या अधिनिस्त सर्व शाळांना अवगत करावे. 

इयत्ता ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव होणेकरिता परिषदेच्या वेबसाईटवर नमुना सराव प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते अपलोड केलेले आहेत. 

वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी त्यांचे स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करणे तसेच संदर्भ क्र. ७ अन्वये शासन निर्णयानुसार इयत्ता ५ वी व ८ वी च्या वार्षिक परीक्षेबाबत कार्यवाही करणेबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना अवगत करावे.

वर्ग पाचवी नमुना प्रश्न पत्रिका

वर्ग आठवी नमुना प्रश्न पत्रिका 



What's Up ग्रुप जॉईन करा
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

What's Up Group Join 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad