जिल्हांतर्गत समुपदेशनाद्वारे शिक्षक
बदली प्रक्रिया राबविणार
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्याआधारे (पवित्र पोर्टलद्वारे) विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी संदर्भ क्र. २ मधील शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.
उपरोक्त विषयांकित मागणीबाबतची निवेदने या विभागास प्राप्त होत आहेत
०२. शासन निर्णय दिनांक २१.०६.२०२३ अनुसार जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वी पासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी, अशी तरतूद आहे.
नवीन शिक्षक भरती सुरु झाली असून जे शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छूक आहेत त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यास आदेशित करावे, अशी मागणी उक्त निवेदनान्वये करण्यात आलेली आहे.
याअनुषंगाने नमूद करण्यात येते की, शासन निर्णय दिनांक २१.०६.२०२३ मधील अ.क्र.२ अनुसार कार्यवाही होत नसल्याबाबत या विभागास अनेक लेखी व मौखिक तक्रारी प्राप्त होत आहेत.
जिल्हा परिषदेअंतर्गत नियुक्त बदलीबाबतच्या सुधारित अटी ग्राम विकास विभागाच्या सहमतीने दिनांक २१.०६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या आहेत.
सदर शासन निर्णयामधील नमूद अ.क्र. २ अनुसार आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आपल्या स्तरावरुन निर्देश देण्यात यावेत, ही विनंती, असे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे
जिल्हा अंतर्गत बदली सन 2023-24
महत्वाची सूचना
दिनांक 8 मार्च 2024 रोजी झालेल्या VC मधील सूचनेनुसार जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सन 2023 24 ( विनंती बदली) अंतर्गत खालील बाबींचा कटाक्षाने विचार करावा.
१. विशेष संवर्ग भाग १ - अंतर्गत पात्र व विनंती अर्ज करणाऱ्या शिक्षकांची माहिती Cadre -1 असा शेरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे
2. विशेष संवर्ग भाग २ -अंतर्गत पात्र व विनंती अर्ज करणारा शिक्षकांची माहिती Cadre -2 असा शेरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे
3. बदली अधिकार प्राप्त - अवघड क्षेत्र अंतर्गत पात्र व विनंती बदलीसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांची माहिती Entitled असा शेरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे
4. बदली पात्र बदली पात्र-शिक्षकांमधून विनंती बदली मागणी करणाऱ्या शिक्षकांची माहिती Eligible असा शिरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे
5. इतर वरील चारही संवर्गामध्ये न येणाऱ्या परंतु विनंती बदली मागणी करणाऱ्या शिक्षकांची माहिती Other असा शेरा नमूद करून भरण्याची आहे


आपली प्रतिक्रिया व सूचना