महावाचन उस्तव २०२४ अंतर्गत
शाळेची नोंदणी व लॉगिन माहिती
लिंक उपलब्ध ! सविस्तर जाणून घ्या
महावाचन उस्तव २०२४ :- शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते. तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते.
महावाचन उस्तव २०२४ अंतर्गत आपल्याला शाळेची नोंदणी व Login
करून वेब एप्लिकेशन्स वर आपली शाळांनी माहिती भरायची आहे.
मुदत वाढ
दिनांक 14/09/2024
उपक्रमाचे स्वरुप :-
● या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे इ. साहित्याची निवड करुन वाचन करतील.
● सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरुपात महावाचन उत्सव 2024 च्या पोर्टलवर अपलोड करतील, यासाठी 150 ते 200 शब्दांची मर्यादा असेल.
● सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा एका मिनिटाची व्हिडिओ/ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव 2024 च्या पोर्टलवर अपलोड करतील.
मूल्यांकनाचे स्वरुप :-
महावाचन उत्सव-२०२४ या उत्सवात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखनांचे मूल्यांकन खालील प्रमाणे करावे.
विषयाची निवड व लिखाणाची पध्दत (३ गुण):-
विद्यार्थ्यांने वाचनासाठी निवडलेल्या पुस्तकांचा विषय, लिखाणासाठी विद्यार्थ्याने वापरलेली भाषा, शुध्दलेखन, हस्ताक्षर, नीटनेटकेपणा इ.
आकलन व अभिव्यक्ती (५ गुण) :
विद्यार्थ्यांने वाचलेल्या पुस्तकाचे किंवा विषयाचे त्या विद्यार्थ्याला झालेले आकलन विचारात घेवून गुणांकन करावे.
विद्यार्थ्यांने वाचलेल्या पुस्तकांचा परिचय स्वभाषेत करणे, पुस्तकाबाबतचे मत, विद्यार्थ्यांची वैचारिक भूमिका इ.
मुखपृष्ठ, मलपृष्ठ, चित्रे, फोटो, आकृत्या इ. बाबत मत (२ गुण):
पुस्तकाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ, अंतरंगातील चित्रे, फोटो,आकृत्या इ. बाबतचे मत.
उपरोक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे १० च्या मर्यादेत शाळेच्याच शिक्षकांनी गुणदान करावे. शिक्षकांच्या केलेल्या गुणदानानंतर नियुक्त केलेल्या समितीकडून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर गुणांकन करण्यात यावे.
शाळांनी आपल्या स्तरावरील प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थीची निवड करावी. प्रत्येक शाळेने फक्त प्रथम तीन क्रमांकाच्या नावे तालुकास्तरावर पाठवावी. प्रत्येक तालुक्यातील निवड करण्यात आलेले प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक जिल्ह्यास कळविण्यात यावे.
तालुक्यातून पात्र विद्यार्थ्यांच्या यादीतून जिल्हास्तरावर (मनपासह) प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी.
जिल्ह्यांकडून पात्र विद्यार्थ्यांमधून राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी.
शाळेची नोंदणी
• शाळेनी प्रथम नोंदणी करावी
• मुख्याध्यापक नाव व आडनाव टाईप करा
• Email ID टाईप करा
• मोबाईल नंबर टाईप करा
• शाळेचा UDISE NO टाईप करा आता शाळेचे नाव , तालुका व जिल्हा Default येईल
• शाळेचा माध्यम निवडा
• वर्ग तिसरी ते बारावी पटसंख्या टाका
• आपल्या सोयीनुसार नवीन पासवर्ड तयार करा
• आता लॉगिन करा
• लॉगिन झाल्यावर Create New वर क्लिक करून विद्यार्थ्यांची माहिती व पूस्तक वाचन माहिती भरा व वाचन करताना व्हिडिओ अपलोड करा
मार्गदर्शन व्हिडिओ आवश्यक पहा
याकरिता खालील प्रमाणे स्टेप करा
1. शाळांनी त्यावर लॉगिन करून आपली प्राथमिक माहिती भरावी.
2. यात शाळांनी आपले user id तयार करायचा आहे.
3. त्या युजर id आपले विद्यार्थ्याची माहिती अपलोड करायचा आहे. त्यामुळे शाळांनी आपला युजर आयडी नीट तयार करावयाचा आहे. तसेच त्यांचा पासवर्ड ही लक्षात ठेवायचं आहे.
4. तालुका, जिल्हा, विभागीय, तसेच राज्यस्तर असे रिपोर्ट तयार होतील. त्यावरून आपल्या अधिनास्त कोण किती काम झाले याचा मागोवा घेऊन आपले काम करता पूर्ण करता येईल.
• रोज 10 मिनिटे काही चांगले नवीन वाचू या.
• वाचनाचे तीन मुख्य फायदे
• जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती हा वाचक असतो.
• वाचन हे ज्ञान आणि नवनिर्मितीचे मुळ/ बीज आहे.
• वाचन हे आनंदासाठी आणि मनाच्या विकासासाठी आवश्यक आहे.
What's Up Group Join
already rejister ahe id mahit nahi
ReplyDeleteरजिस्ट्रेशन झाले मात्र लॉगिन failed असा मेसेज येतोय काय करावे. पासवर्ड रीसेट केला तरी तोच प्रॉब्लेम आहे
ReplyDeleteरजिस्ट्रेशन केले. युजर आय डी न येता, युडायस नं. वर नोंद झाली. काही सारांश अपलोड केले,नंतर मात्र log in होत नाही आहे, काय करावे?
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया व सूचना