सरल पोर्टलवर संचमान्यता
सन २०२४-२०२५ बाबत
संदर्भ : शासन पत्र क्रमांक न्यायाप्र-२०२४/प्र.क्र.१६७/टिएनटी-२, दिनांक १२.०७.२०२४
उपरोक्त विषयी मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथील रिट याचिका क्रमांक २८२२/२०२४ व रिट याचिका क्रमांक ५४७२/२०२४ मधील दिनांक १२.०६.२०२४ रोजीच्या आदेशान्वये मा. न्यायालयाने रिट याचिका क्रमांक २८९६/२०२४ मधील दिनांक १५.०३.२०२४ रोजीच्या आदेशातील परिच्छेद ५ मधील निर्देशाच्या अनुषंगाने संदर्भीय पत्रान्वये शासनाने निर्देश निर्गमित केलेले आहेत.
२/- शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत. तसेच शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत.
३/- सदरच्या शासन निर्णयान्वये दिनांक ३०.०९.२०२४ रोजीच्या आधार वैध पट विचारात घेवून संचमान्यता व समायोजन करण्याची कार्यवाही करण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तरी, सन २०२४- २०२५ च्या संचमान्यता विहित कालावधीत करण्यासाठी 'सरल' प्रणालीतील आवश्यक माहिती
दिनांक ३०.०९.२०२४ पुर्वी पूर्ण करुन घेण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात यावेत.
• 'सरल' प्रणालीतील विद्यार्थी प्रमोशन
• शाळा प्रोफाईलची माहिती,
• कार्यरत पदांची माहिती,
• 'सरल' प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती,
• विद्यार्थ्याचे आधार वैधता
व इतर आवश्यक कार्यवाही विहित कालावधीत पुर्ण करण्यात यावेत. यामध्ये विलंब झाल्यास संबंधित जबाबदार राहतील यांची नोंद घेण्यात यावी.
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना