प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण
योजनेअंतर्गत लेखापरीक्षण होणार !
संपूर्ण मार्गदर्शन व माहिती
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सर्व मुख्याध्यापकांना सुचित करण्यात येते की, सन 2020- 21 ते 2023-24 या 4 वर्षाचे MDM लेखापरीक्षण होणार आहे.
MDM लेखापरीक्षण फॉर्म भरणेबाबत
सन 2020-21 ते 2023-24 लेखा परीक्षण
➤ लॉकडाऊन वर्षातील ताटांची संख्या काढणे
लॉकडाऊन असलेल्या वर्षातील मधील तांदळाची माहिती भरताना
टेबल नं 11 -
(कोवीड कालावधीत जेवढा तांदूळ वाटप केला असेल त्या वाटप केलेल्या तांदूळ)
÷ इयत्ता 1 ते 5 करिता 0.100 व 6 ते 8 करिता 0.150 केल्यानंतर ताटांची संख्या मिळेल.)
उदा.
वाटप तांदूळ ÷ 0.100 ( इ. 1 ते 5 )
वाटप तांदूळ ÷ 0.150 ( इ. 6 ते 8 )
ताटांची संख्या मिळेल
➤ व्याज बाबत
शालेय पोषण आहार अंतर्गत अनुदान बँकेत जमा झाल्यानंतर आपण ती रक्कम जास्त कालावधीत बँकेत ठेवत नाही आपण लगेच त्या अनुदानाची उचल करत असतो त्यामुळे त्या अनुदानावर शक्यतो व्याज मिळत नाही, म्हणून लेखापरीक्षण फॉर्म भरताना शक्यतो व्याज दाखवू नये
आपल्याला बँकेत व्याज दिसत असेल तर ते इतर अनुदानावर मिळालेले व्याज असेल
लेखापरीक्षण फॉर्म भरताना फक्त शालेय पोषण आहार अंतर्गत मिळालेले अनुदान व रक्कम हेच अपेक्षित आहे
➤ महाडीबीटी अनुदान
शाळा बंद असताना शालेय पोषण आहार अंतर्गत महाडीबीटी अनुदान प्रत्येकी विद्यार्थी 210 रु. प्रमाणे शाळेला अनुदान प्राप्त झाले होते.
जमा बाजू -
लेखापरीक्षण फॉर्ममध्ये जमा बाजू रकान्यात प्राप्त अनुदान लिहिताना टेबल क्रमांक 19 नुसार प्राप्त अनुदान R12 हा कोड लिहावे
खर्च बाजू -
लेखापरीक्षण फॉर्ममध्ये खर्च बाजू रकान्यात खर्च अनुदान लिहिताना टेबल क्रमांक 20 नुसार वाटप अनुदान E31 हा कोड लिहावे
शंका समाधान
१. ओपनिंग बॅलन्स म्हणजे काय?
चालू वर्षाची ओपनिंग बॅलन्स म्हणजे गेल्या वर्षीची क्लोजिंग बॅलन्स.
चालू वर्षाची ओपनिंग बॅलन्स म्हणजे गेल्या वर्षीची क्लोजिंग बॅलन्स.
➤ उदाहरण: -२०१९-२० या कालावधीसाठी ३१-मार्चचा, क्लोजिंग बॅलन्स
२०२०-२१ या कालावधीसाठी ०१-एप्रिल, ओपनिंग बॅलन्स म्हणून गृहीत धरले जाईल.
२. बँक व्यवहारात प्रवेश करताना प्राप्त अनुदान व्यवहार प्रकारात काय नोंदवतील?
➤ अनुदान प्राप्त झालेले त्या त्या हेड ला जमेची व खर्चाची नोंद करावी.
उ.दा. इंधन व भाजीपाला, स्वयंपाकी अनुदान, शिक्षक अनुदान, बँकेत मिळालेलं व्याज, स्टेशनरी व भांडी खरेदी, बँक चार्जेस याची नोंद इतर अनुदानात करावी
प्राप्त अनुदानात त्या व्यवहारांची नोंद करतील जे वरील सूचीमध्ये नोंदवले जाऊ शकत नाहीत.
या व्यतिरिक्त आलेल्या अनुदानाची नोंद हि प्राप्त अनुदानात करावी.
वरील प्रमाणे आलेले अनुदान व खर्ची नोंद करावी.
३. बँक व्यवहारात प्रवेश करताना इतर उत्पन्न / खर्च व्यवहार प्रकारात काय नोंदवले जातील?
➤ इतर खर्च हे सर्व उत्पन्न/खर्च नोंदवतील जे प्रिंटिंग आणि स्टेशनरी, भांडी खरेदी केली व इतर खर्च असल्यास किंवा मिड डे मील योजनेशी संबंधित असलेला कोणताही खर्च.
४. बँक/ कॅश बुक नोंद करताना निगेटिव्ह बॅलन्स आला तर काय कराल?
➤ जमा व खर्च याची योग्य त्या प्रमाणे नोंद झाली आहे का? ते तपासावे आणि महिन्याच्या शेवटी कॅश / बँक बुकची शिल्लक रक्कम तपासून पाहावी, ती बरोबर आहे किंवा नाही त्याची पडताळणी करावी, जर तो बॅलन्स चुकीचा असेल तर बरोबर करून घ्यावा. त्या नंतर तो पॉप-अप निघून जाईल.
५. बँक व्यवहार रेकॉर्ड करताना केलेल्या नोंदी कशा बदलायच्या/हटवायच्या?
i) रेकॉर्ड केलेले व्यवहार टेबलच्या खालील बाजूस दिसतील "एंटर केलेले बँक व्यवहार".
ii) एंट्रीमध्ये बदल करण्यासाठी, रेकॉर्ड केलेल्या व्यवहाराच्या बाजूला असलेल्या लाल रंगात 'X' चिन्हावर क्लिक करून, तुम्हाला प्रथम एंट्री डिलीट करावी लागेल.
iii) डिलीट केलेली एंट्री पुन्हा रेकॉर्ड करण्यासाठी पुन्हा प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
६. योजनेतून लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कशी भरायची?
➤ सारणीच्या सर्वात वरच्या स्तंभावर नमूद केलेल्या संबंधित वर्षासाठी वार्षिक आधारावर रक्कम प्रविष्ट करणे आवश्यक आहे (उदा: ०१-एप्रिल-२०२० ते ३१-मार्च-२०२१). इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांची संख्या प्रविष्ट करावी. १ली ते ५वी आणि इयत्ता ६वी ते ८वी पर्यंतचे विद्यार्थी.
७. विद्यार्थी संख्या कशी? कोठून घ्यावी? (प्रत्येक वर्षाची समरी करून देण्यात यावी)
➤ १ली ते ५वी व ६वी ते ८वी असे दोन तक्ते करावेत.
वर्ष
पटावर असलेली विद्यार्थी संख्या
लाभार्थी विद्यार्थी संख्या
२०२०-२१
२०२१-२२
२०२२-२३
२०२३-२४
वर्ष | पटावर असलेली विद्यार्थी संख्या | लाभार्थी विद्यार्थी संख्या |
२०२०-२१ | | |
२०२१-२२ | | |
२०२२-२३ | ||
२०२३-२४ |
८. तांदळाच्या ओपनिंग स्टॉकमध्ये काय भरायचे?
➤ मागील वर्षाच्या शेवटच्या दिवशी बंद होणारा स्टॉक चालू वर्षाच्या पहिल्या दिवशी ओपनिंग स्टॉक होईल. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच संबंधित वर्षाच्या १ एप्रिल रोजीचा स्टॉकचा मोजमाप असा आकडा आवश्यक आहे.
- तांदळाचा साठा हा निगेटिव्ह नसावा व तो तुमच्या रजिस्टर प्रमाणे असावा याची काळजी घ्यावी.
९. तांदळाच्या स्टॉक ची समरी कशी द्याल? (आरंभीचा साठा १ एप्रिल व अखेरचा साठा ३१ मार्च)
प्रत्येक वर्षाची माहिती खालील प्रमाणे द्यावी.
• वर्ष
• आरंभीची साठा
• आलेला साठा
• वापरलेला साठा
• अखेरचा साठा
२०२०-२१
२०२१-२२
२०२२-२३
२०२३-२४
२०२०-२१
२०२१-२२
२०२२-२३
२०२३-२४
१०. डॉक्युमेंट कोणते, किती साईझ मध्ये अपलोड करावेत?
➤ फक्त स्वाक्षरी आणि शिक्का असलेला मॅन्युअली भरलेला फॉर्म अपलोड करावा लागेल. अपलोड करताना आकार 10 एमबीपेक्षा कमी असावा.
११. लेखापरीक्षणाच्या वेळी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
1. बँक पासबुक
2. कॅश बुक
3. स्टॉक बुक (तांदूळ आणि इतर)
४. चलन (सरकारी खात्यात जमा झालेली रक्कम)
5. व्हाउचर फाइल
6. वेब फॉर्म
7. उपयोगिता प्रमाणपत्र (फॉर्म बी)
12. झालेल्या लेखापरीक्षणाची पावती ?
➤ लेखापरीक्षण पूर्ण झालेल्या शाळांचा अहवाल जिल्हा स्तरावर सादर केला जाईल.
शालेय पोषण आहार लेखा परीक्षण
तपशील | डाउनलोड | |
---|---|---|
1. | परिपत्रक | Download |
2. | Excel Sheet | Download |
3. | लेखापरीक्षण नमुना | Download |
Web Online
शालेय पोषण आहार लेखापरीक्षण ऑनलाईन करण्याकरिता खालील लिंक उपलब्ध आहे
➤ खालील लिंक वर क्लिक करा
मार्गदर्शन व्हिडिओ
➤ खालील लिंक वर क्लिक करा
➤ खालील लिंक वर क्लिक करा
What's Up Group Join
आपली प्रतिक्रिया व सूचना