NMMS परीक्षा 2024 निकाल
जाहीर !MSCE पुणे
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2024-2025
Maharashtra NMMS Result 2025
गुणयादी बाबत सूचना....
१) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दिनांक ०७/०२/२०२५ रोजी परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
२) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड, इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दिनांक १८/०२/२०२५ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष, अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही.
३) आलेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
४) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बानलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.
५) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
६) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित ४० % गुण मिळणे आवश्यक आहेत. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचीत जमाती (ST) व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित ३२ % गुण मिळणे आवश्यक आहेत)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - 04.
प्रसिध्दी निवेदन
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ.८ वी साठी परीक्षा दिनांक २२ डिसेंबर, २०२४ गुणयादीबाबत.
सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याच्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्याथ्यांमधून प्रज्ञावान विद्याव्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु. १,०००/- (वार्षिक रु. १२,०००/-) आहे.
इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उपन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्याथ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यर्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादो परिषदेच्या वरील संकेतस्थळावर दिनांक ०७/०२/२०२५ रोजी पासून पाहता येईल.
सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दिनांक १८/०२/२०२५ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये अर्ज करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही.
प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्याव्यांची निवड यादी परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल,
सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आली असल्याने गुणपडताळणी केली जात नाही.
What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना