मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे
विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार
परीक्षा पे चर्चा या विषयास अनुसरून सन 2024 - 25 या कालावधीत मा. महोदय, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.
या अंतर्गत दिनांक 10/02/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता थेट प्रक्षेपण होणार असून सदर परीक्षा पे चर्चा 2025 च्या 8 व्या आवृत्तीचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनद्वारे, डीडी नॅशनल, डीडी न्यूज आणि डीडी इंडिया इत्यादी वाहिन्यांवर 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता केले जाईल. बहुतेक खाजगी वाहिन्याही हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित करतील.
तसेच, हे कार्यक्रम रेडिओ वाहिन्यांवर (आकाशवाणी मध्यम लहरी, आकाशवाणी एफएम वाहिनी) थेट प्रसारित केले जाईल. पंतप्रधान कार्यालय, शिक्षण मंत्रालय, दूरदर्शन, MyGov.in आणि शिक्षण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेल, फेसबुक लाइव्ह, दीक्षा, पीएम ई-विद्या आणि स्वयंप्रभा वाहिन्यांच्या वेबसाइट्सवर थेट वेब स्ट्रीमिंगद्वारेही उपलब्ध असेल. याबरोबरच सदर प्रक्षेपण ऑनलाइन पाहण्यासाठी खालील लिंकवर उपलब्ध आहे:
तरी राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळा, केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, शाळा यांना सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्याकरिता आवश्यक ती व्यवस्था करणे विषयी निर्देश द्यावेत. त्याचबरोबर सर्व जिल्हा परिषद, सर्व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्था (DIETs), येथे ही हा कार्यकम पाहण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून आपल्या राज्यातील इ.6 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी हे थेट प्रसारण पाहू/ऐकू शकतील.
चला तर, 'परीक्षा पे चर्चा - 2025' या परीक्षेच्या उत्सवात सहभागी होऊया.
राहूल रेखावर (भा.प्र.से.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
आपली प्रतिक्रिया व सूचना