हर घर तिरंगा 2025
उपक्रम संपूर्ण माहिती व अंमलबजावणी
"हर घर तिरंगा 2025" उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक कार्यवाही बाबत.
संदर्भ : 1. भारत सरकार, सांस्कृतिक मंत्रालय यांचे VC मधिल निर्देश दिनांक 01.08.2025.
2. निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती यांचे पत्र क्रं कक्ष-8. विली/संदर्भ. कावी/250/2025 दि 01/08/2025
उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने दि.01.08.2025 रोजीच्या व्हिडिओ कॉन्फरन्स अंतर्गत प्राप्त निर्देशांचे अनुषंगाने, सन 2022 पासून "हर घर तिरंगा" हा उपक्रम भारत सरकारने स्वातंत्र्य सप्ताहात राबविण्यास सुरुवात केली असून, यावर्षी 2025 मध्ये सदर उपक्रम 3 टप्प्यांमध्ये दिनांक 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
उपक्रमाचा उद्देश प्रत्येक नागरिकाने राष्ट्रीय ध्वजाशी वैयक्तिक नाते जोडणे, देशभक्तीची भावना निर्माण करणे व जनभागीदारीद्वारे राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे हा आहे.
सदर उपक्रमांचे तपशीलवार टप्पे व निर्देश पुढीलप्रमाणे कार्यान्वीत करावयाचे आहेतः
प्रथम टप्पाः 2 ऑगस्ट 8 ऑगस्ट 2025
1) शाळा, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी तिरंगा प्रेरित सजावट,
2) #Har Ghar Tiranga 2025 या हॅशटॅगसह सोशल मीडियावर फोटो शेअर करणे,
3) तिरंगा रंगोली स्पर्धा / कार्यशाळा.
4) तिरंगा राखी बनवण्याच्या स्पर्धा अंगणवाडी, शाळा, वृद्धाश्रम, मॉल्स यामध्ये तिरंगा विषयक प्रश्नमंजुषा - MyGov व शाळांमध्ये जवानांसाठी पत्रलेखन उपक्रम.
5) स्वच्छता व पाणी "हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान (8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट) संजीवनीवर विशेष भर.
6) स्वयंसेवक कार्यक्रम प्रचारकांनी घरोघरी तिरंगा पोचवणे व जनजागृती करणे.
द्वितीय टप्पा : 9 ऑगस्ट 12 ऑगस्ट 2025
1) राज्यस्तरीय "तिरंगा महोत्सव" मान्यवरांच्या उपस्थितीत.
2) तिरंगा मेला व देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम.
3) तिरंगा बाईक व सायकल रॅली, तिरंगा यात्रा व मानवी साखळ्या.
4) तिरंगा विक्री स्थानिक उत्पादक व स्वयं सहायता गटांचा सहभाग.
5) मीडिया व सोशल मीडिया प्रचार हॅशटॅगसह प्रसिद्धी.
6) प्रत्येक घरात तिरंगा विकत घेण्याचे आवाहन.
तृतीयं टप्पा : 13 ऑगस्ट 15 ऑगस्ट 2025
1) घर, कार्यालय, वाहनावर तिरंगा फडकावणे.
2) सेल्फी व फोटो अपलोड www.harghartiranga.com वर.
3) ध्वजारोहण समारंभ शहरी व ग्रामीण स्तरावर.
4) कार्यक्रमाचे प्रसारण व प्रसिद्धी.
"हर घर तिरंगा - 2025" उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
आपल्या विभागा अंतर्गत सर्व शासकीय इमारती, कार्यालये, शाळा, उपकेंद्रे यामध्ये तिरंगा सजावट व जनजागृती उपक्रम राबविण्यात यावे. अधिनस्त कर्मचा-यां मार्फत नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना तिरंगा खरेदी व फडकाविण्यास प्रेरित करण्यात यावे. तसेच कार्यालयामार्फत तिरंगा खरेदी करतांना मागील "हर घर तिरंगा 2024" उपक्रमानंतर उर्वरित तिरंगा यांचाही वापर प्रथम करण्यात यावा. अधिनस्त सर्व ग्रामपंचायत शाळांशी समन्वय साधून विविध कार्यक्रमांची आखणी व अंमलबजावणी करावी. कार्यक्रमाचे फोटो व अहवाल www.harghartiranga.com वर अपलोड करावेत.
तसेच विशेष स्वयंसेवक नामनोंदणीस प्रोत्साहन देण्यात यावे. आपल्या विभागातील सर्व घटकांना व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्यास प्रवृत्त करावे व "हर घर तिरंगा 2025" उपक्रमास यशस्वी करण्यात आपला सक्रीय सहभाग द्यावा, तसेच यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आपल्या स्तरावरून करण्यात याव्यात, व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा
What's Up Group Join
➤ What's Up Group Join


आपली प्रतिक्रिया व सूचना